आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:ऑक्सिजन गळतीची ती 21 मिनिटे...; मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितला ऑक्सिजन वायू गळतीचा थरारक अनुभव

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी यांनी त्या 21 मिनिटांत काय घडले हे ‘दिव्य मराठी’शी बाेलताना उलगडले.

घड्याळाचा काटा दुपारी १२ वाजून १८ मिनिटांवर स्थिरावला. नेहमीप्रमाणे अग्निशामक क्रमांक १०१ वरील काॅल खणाणत हाेते. शववाहिकांसाठी काॅल असेल असे वाटत असताना अचानक पालिकेच्या डाॅ. झाकीर हुसेन रुग्णालयातील अाॅक्सिजन टाकी फुटली, असा संदेश कैलास माेरे नामक व्यक्तीने दिला. क्षणाचा विलंब न करता चार कर्मचाऱ्यांसह शिंगाडा तलावावरून बंब घेऊन अवघ्या चार मिनिटांत दाखल झालाे. त्यानंतर पुढील तब्बल १७ मिनिटे अक्षरश: हतबुद्ध करणारी हाेती. भले माेठे बर्फाच्छादित हवेचे लाेट, उणे १७० अंशांचे अंगावर येणारे फवारे, नेमकी गळती काेठे झाली हे कळेनासे झाल्यानंतर टाकीवर पाण्याचा फवारा सुरू केला. त्यानंतर गळती काेठे हे समजले व मेन व्हाॅल्व्ह बंद करून टाकीतील निम्मा अाॅक्सिजन वाचविण्यात यश मिळाले व पुरवठा सुरळीत करण्यास पुढे एक तास लागल्यामुळे झालेले मृत्यू मनाला चटका लावून गेले. मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी यांनी त्या २१ मिनिटांत काय घडले हे ‘दिव्य मराठी’शी बाेलताना उलगडले.

अग्निशमन बंब घेऊन चार मिनिटांत घटनास्थळी गेलाे. त्यावेळी १२ वाजून २२ मिनिटे झाली असतील. अाॅक्सिजन द्रव स्वरूपात असून त्याचे तपमान उणे १७० ते १९० अंश असल्याने जेथे टाकी हाेती, तेथून बर्फाच्छादित लाेट बाहेर येत हाेते. बीए सूट घालून अाम्ही सज्ज झालाे, मात्र पुढे काय सुरू अाहे हे दिसत नव्हते. टाॅर्च लावूनही काहीच दिसत नसल्याने या ठिकाणी जाणेही शक्य नव्हते. काय करावे हे समजत नव्हते. गळती नेमकी काेठून हाेत अाहे हे कळत नव्हते. क्षणार्धात अाम्ही पाण्याचा फवारा करण्याचे ठरवले व टाकीवर पाण्याचा मारा सुरू केला. त्यानंतर टाकीच्या उजव्या बाजूकडून गॅसचे लाेट येत असल्याचे लक्षात अाले. तेथे टाकीतून रुग्णालयाला अाॅक्सिजन पुरवठा करणारा एक पाइप फुटल्याचे समाेर अाले.

याच ठिकाणी एक रेड कॅप हाेती व त्याखाली टाकीतील अाॅक्सिजन बाहेर पडू नये यासाठी व्हाॅल्व्ह लावला असल्याचे समजल्यानंतर संबंधित कॅप काढून व्हाॅल्व्ह बंद केला. त्यामुळे टाकीतील किमान २५ टक्के गॅस वाचवता अाला. टाकीतील गॅसचा साठा वाचवता अाला मात्र रुग्णालयाला हाेणारा पुरवठा खंडित झाला हाेता. त्यानंतर येथे तंत्रज्ञाचे पथक अाले व त्यांनी गॅस वेल्डिंगच्या सहाय्याने पाइप जाेडून अाॅक्सिजन पुरवठा पूर्ववत केला. मात्र, त्यात जवळपास एक ते सव्वा तास लागला. नशीब इतके ही दुर्घटना दुपारी घडल्यामुळे नियंत्रणात अाणणे लवकरच शक्य झाले. हीच घटना रात्री झाली असती तर अापत्ती अाणखीच बिकट झाली असती. अग्निशामक विभागाचा यासंदर्भातील अहवाल अायुक्तांकडे साेपवला जाणार असल्याचे बैरागी यांनी शेवटी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...