आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑक्सिजन गळतीने घेतला 22 जणांचा बळी:नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळती, 22 जणांचा मृत्यू; अनेक रुग्ण अजुनही गंभीर

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गळतीनंतर दुरुस्तीसाठी अर्धा तास रोखला होता ऑक्सिजनचा पुरवठा

येथील महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने रुग्णांचे जीव टांगणीला आहे. या घटनेमुळे झाकीर हुसैन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर आहेत. सुरुवातीला 11 जणांच्या मृत्यूचे वृत्त आले होते, अवघ्या काही मिनिटांत मृतांचा आकडा दुपटीने वाढला. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 13 केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक लावण्यात आला आहे. हाच टँक बुधवारी लीक झाला. हा टँक लिक होऊन अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा बंद होता. पण, कुटुंबियांचा आरोप आहे की, हा पुरवठा दोन तास बंद होता.

ऑक्सिजनच्या टँकची दुरुस्ती करण्यात आली आहे.या रुग्णालयात ऑक्सिजनवर 131 रुग्ण आहेत. तर अत्यवस्थ रुग्ण 15 व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला आहे.महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय असून सुमारे दीडशे रुग्ण येथे दाखल आहेत.

अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत. ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला असून त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने 15 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...