आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा:28 डिसेंबरला वणी येथे आयोजन; गावातच मिळणार रोजगार संधी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात आर्ट्, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालय, वणी, ता. दिंडोरी यांचे संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कर्मवीर रावसाहेब थोरात आर्ट्, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालय, वणी येथे हा रोजगार मेळावा होणार असून नोकरी इच्छुक तरुणान करिता ही मोठी संधी आहे.

जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या , नियोक्ते येथे उपस्थित राहुन प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. तसेच स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉल लावण्यात येणार असुन कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा

या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे.

रिक्त पदे अधिसूचित करण्याचे आवाहन

भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhayay Job Fair ऑप्शनवर Click करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा यावर रिक्तपदे अधिसूचित करावी व दिनांक 28 डिसेंबर, 2022 रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे. याबाबत काही अडचणी आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 0253-2993321या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नाशिक च्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अनिसा ला. तडवी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...