आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik Plugers Youth Collects 400 Kilos Of Garbage By Conducting Sanitation Campaign, Appeals To Citizens To Carry Out Regular Campaigns

मिशन क्लीन अप:तरुणाईने स्वच्छता माेहीम राबवत संकलित केला 400 किलाे कचरा, नागरिकांना नियमित माेहीम राबविण्याचे आवाहन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. परिसर स्वच्छ राहिला तर स्वच्छतेबराेबर पर्यावणाचेही संवर्धन हाेण्यास मदत हाेत असते. याच पार्श्वभुमीवर पर्यावरण दिनाचे औचित्य साधत नाशिक प्लॉगर्स या तरुणाईच्या ग्रुपकडून इंदिरानगर जाॅर्गिंग ट्रॅक परिसरात स्वच्छता माेहीम राबवत पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या माेहिमेच्या माध्यमातून 400 किलाेहून अधिक कचऱ्यांचे संकलन करण्यात आले.

नाशिक प्लॉगर्सच्या मिशन क्लीनअप माेहिमद्वारे शहरात ठिकठिकाणी स्वच्छता माेहीम राबवली जाते. या स्वच्छता माेहिमेत सहभागी तरुण-तरुणीकडून स्वच्छता माेहिमेबराेबर नागरिकांचे प्रबाेधन देखील केले जात आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत इंदिरानगर जाॅर्गिंग ट्रॅक परिसरात स्वच्छता करण्यात आली. साईनाथनगर ते बाेगद्यापर्यंत जाॅगिंग ट्रॅकसह परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला.

विशेष म्हणजे या माेहिमेच्या माध्यमातून 400 किलाेहून अधिक कचऱ्यांचे संकलन करण्यात आले. तरुणाईच्या या माेहिमेत स्वच्छतेबाबत जनजागृतीपर उपक्रम राबविले. यात चंद्रकिशाेर पाटील यांचाही सहभाग हाेता. स्वच्छतेसाठी तरुणाईकडून राबविण्यात आलेल्या या माेहिमेचे उपस्थित नागरिकांकडून विशेष काैतूक करण्यात आले.

नागरिकांना नियमित माेहीम राबविण्याचे आवाहन

आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमी नागरिकांनी दर आठवड्यात स्वच्छता माेहीम आपआपल्या परिसरात राबवली तर शहर स्वच्छ-सुंदर हाेण्यास मदत हाेईल, असे आवाहन नाशिक प्लॉगर्सच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...