आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातपूर येथील राजकीय पक्षाचे पदाधिकारी असलेल्या विक्रम नागरे यांच्या घरावर टाेळक्याने केलेल्या दगडफेक प्रकरणी सातपूर पाेलिसांनी सुमारे 13 जणांवर माेक्का अंतर्गत कारवाई केली हाेती. याबाबतचा प्रस्ताव नाशिकच्या पाेलिस आयुक्तांनी महासंचालक कार्यालयाकडे पाठवला हाेता. मात्र कायदा व सुरक्षा विभागाच्या अपर महासंचालकांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनयमानुसार पुरेसे पुरावे नसल्याचे कारण देत पाेलिस आयुक्तांचा प्रस्ताव अमान्य केला.
सातपूर पाेलिस ठाण्यात नाेव्हेंबर 2022 मध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. यातील संशयितांवर कारवाई हाेऊन त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आल्यानंतर सातपूर पाेलिसांनी माेक्का अंतर्गत कारवाई केली हाेती. पाेलिस आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव 21 मार्च 2023 राेजी मान्यतेसाठी पाठवला हाेता.
अवगत करण्याचे आदेश
सक्षम प्राधिकारी म्हणून अपर पाेलिस महासंचालकांनी प्रस्तावाची छाननी केली, परंतु माेका कायद्यांतर्गत कारवाईसाठी पुरेसा पुरावा उपलब्ध हाेत नसल्यामुळे न्यायालयात माेका कायद्यांतर्गत दाेषाराेप पत्र सादर करण्यास पाेलिस आयुक्तांनी केलेली विनंती अमान्य केली. तसेच सबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार याेग्य ती कारवाई करून अवगत करण्याचे आदेश नाशिक पाेलिस आयुक्तांना देण्यात आले आहे.
राजकीय दबाव
पाेलिस महासंचालकांच्या वतीने वरिष्ठ कार्यासन अधिकारी जी.एस. वाघमाेडे यांनी हे आदेश पारित केले आहेत. घटनेच्या काही दिवसानंतर मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी सातपूर पोलिसांवर प्रचंड राजकीय दबाव टाकण्यात येत होता. त्यामुळेच पोलिसांनी घाईने गुन्हा दाखल केल्याचे बोलले जात होते.
विरोधकांचाही हस्तक्षेप
पुरावे नसतानाही पोलिसांनी मोक्यासारख्या कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरात वेगवेगळ्या चर्चा झडत होत्या. एकूणच पोलिसांच्या कामगिरी बाबत व राजकीय हस्तक्षेपामुळे उलट सुलट चर्चा घडत असल्यामुळे या प्रकरणात विरोधकांचाही हस्तक्षेप वाढला होता. याचाच फायदा या गुन्ह्यातील संशयतांना झाल्याची चर्चा सातपुर परिसरात सुरू आहे. शनिवारी पोलिसांच्या वतीने न्यायालयात मोकांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.