आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसानग्रस्ताला न्याय मिळणार:अपघाताचा पंचनामा करणारे पाेलिसच‎ हाेणार फिर्यादी; पोलिस आयुक्तांचा निर्णय‎

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक‎ अपघातांच्या गुन्ह्यात अपघातग्रस्ताचे, ‎अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे ‎नातेवाइक किंवा तेही नसतील तर ‎प्रथमदर्शनी व्यक्तीची फिर्याद घेतली‎ जाऊन अपघाताचे गुन्हे दाखल केले‎ जात होते. मात्र, अाता हे गुन्हे‎ उघडकीस येण्यासाठी पंचनामा‎ करणाऱ्या पोलिसांचीच फिर्याद‎ घेण्याच्या सूचना पोलिस अायुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या अाहे.‎

अपघातांचा गुन्हा दाखल‎ करण्यासाठी एकतर फिर्यादीच काेणी‎ नसते किंवा नातेवाइकांनी वा इतर‎ काेणी गुन्हा दाखल केलाच तर‎ अाराेपीकडून ताे मागे घेण्यासाठी दबाब‎ टाकला जातो. यामुळे हे गुन्हे‎ उघडकीस येण्याचे प्रमाण घटत‎ असल्याने संबंधित पोलिस ठाण्याचा‎ कर्मचारीच अाता फिर्यादी असणार‎ अाहे. अपघाताचा गुन्हा घडल्यानंतर‎ फिर्यादी अाणि तपासी अधिकारी‎ यांच्या तपासात नुकसानग्रस्त व्यक्तीला‎ न्याय मिळणार असल्याने या निर्णयाचे‎ स्वागत होत अाहे.‎

अशी होती पूर्वीची प्रक्रिया‎

अपघात घडल्यानंतर पोलिस‎ कर्मचारी घटनास्थळावर पंचनामा‎ करून प्रत्यक्षदर्शी अथवा‎ अपघातग्रस्त व्यक्तीच्या‎ नातेवाइकाची फिर्याद घेत होते.‎ अपघाताच्या गुन्ह्याचा तपास‎ हवालदार ते उपनिरीक्षक दर्जाचे‎ अधिकारी करत होते. फिर्यादी‎ वेळेअभावी उपलब्ध नसल्याने‎ तपासात विलंब होतो. यामुळे दोष‎ सिद्ध होण्यास वेळ लागतो.‎

अपघातग्रस्तांना न्याय‎ अपगातातील मयत वा नातेवाइकाला‎ ‎ फिर्यादीला‎ ‎ अपघाताची‎ ‎ कल्पना नसते.‎ ‎ दोषारोप सिद्ध‎ ‎ करताना अडचणी‎ ‎ येतात.‎ अपघातांच्या गुन्ह्यात अाता पोलिस‎ कर्मचारीच फिर्याद देतील. त्यामुळे‎ मदत हाेऊन अपघातग्रस्ताला न्याय‎ मिळेल. - अंकुश शिंदे, अायुक्त‎