आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय?:प्रकाश आंबेडकर म्हणाले - शिवसेनेच्या निर्णयानंतर आपली भूमिका करणार स्पष्ट

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जि्ल्हयातील दोन मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करत आहे. मात्र वंचित बहूजन आघाडी जर शिवसेनेने उमेदवार दिला तर त्यांना पाठिंबा देईल् त्यांच्यासह आमची युती आहे. मात्र, जर शिवसेनेने दोन्ही जागा लढवाव्या कारण कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीने इथे उमेदवारच जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेनंतर आम्ही भूमिका स्पष्ट करणार आहोत असे वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षांशी संपर्कदेखील केला आहे. लोकशाहीत बिनविरोधी ही संकल्पनाच नाही, अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी दिली. आमदाराच्या निधनामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती असेलच, याबाबत दुमत नाही. मात्र, येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये. ही संकल्पना लोकशाहीत बसत नाही. त्यामुळे लोकांना नवीन लोकप्रतिनिधी निवडू द्यावे, या मताचा मी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

शिंदे गटाकडून बिनविरोधसाठी प्रयत्न

एखाद्या मतदारसंघात लोकप्रतिनिधींचे निधन झालेले असल्यास त्याठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा खंडित होऊ नये, यासाठी शरद पवार नक्कीच मार्ग काढतील. ते सर्वांचे नेते आहेत. अशी इच्छा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डी येथे व्यक्त केली आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रयत्न सुरु केले आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. आता यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही आवाहन केले आहे.

राऊत म्हणाले निवडणूक होणारच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आवाहन केले आणि राज ठाकरेंनी जरी पत्र लिहले तरीही कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुका होतीलच, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, अंधेरी पोटनिवडणूक हा अपवाद असला तरी तिथे निवडूक झाली होती. पंढरपूरला आणि नांदेडला देखील पोटनिवडणूक झाली होती. तिथे भाजपने उमेदवार दिला होता. तसेच, राज्यातील जनमत आता भाजपच्या विरोधात आहे. कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाची भीती आहे. म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले जात आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...