आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील जनतेस वेठीस धरून सामान्य जनतेचे नुकसान करण्याचे काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करत आहे. या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नाशिकमध्ये पर्दाफाश आंदोलन केले. गोरगरिबांच्या पैशाचा हिशोब कोण देणार असा सवालही विचाारण्यात आला. सरकारविरोधी घोषणाबाजीमुळे आंदोलन परिसर दणाणून गेला होता.
नाशिक रोड येथे स्टेट बँक शाखा दुर्गा उद्यान,नाशिकरोड येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. सरकारने भांडवलदारांच्या हितासाठी केलेली जनतेची फसवणूक सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष आकाश छाजेड,नाशिकरोड ब्लॉक अध्यक्ष दिनेश निकाळे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील,महिला काँग्रेस शहराध्यक्ष स्वाती जाधव, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष हानीफ,बशीर प्रदेश सरचिटणीस जावेद इब्राहिम आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.
चौकशीची मागणी
आंदोलनाच्या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी अदानी समूह केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडले होते. याचबरोबर सर्वसामान्य गोरगरिबांचा पैशांचा हिशोब कोण देणार?असा सवालही विचारण्यात आला. एलआयसी सारख्या संस्थांच्या पैसे गुंतवणुकीचा निर्णय घेणाऱ्या समितीचा सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत चौकशी संसदीय समितीच्या मार्फत होत नाही, तोपर्यंत आंदोलन तीव्र स्वरूपात केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत चौकशी संसदीय समितीच्या मार्फत होत नाही, तोपर्यंत आंदोलन तीव्र स्वरूपात केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. शहर काँग्रेसच्या वतीने नाशिक शहरामध्ये असाही विभागांमध्ये या समूह घोटाळ्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरू असून आणखी आठवडाभर हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.