आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीच्या गलथान कारभार:नाशिककरांचे आंदाेलनातून उत्तर, गाेदाघाटावर उद्या वारसा स्थळांना वाहणार श्रद्धाजंली

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेदाघाटावरील पुरातन निलकंठेश्वर महादेव मंदिर परिसरात स्मार्ट सिटीकडून सुरू असलेल्या कामामुळे परिसरातील मंदिरांना तडे गेले आहे. तसेच गेल्या 9 महिन्यांपासून पायऱ्या देखील ताेडल्या आहे. सुशाेभिकरणाच्या नावाखाली स्मार्ट सिटीकडून गाेदाकाठचा पुरातन ठेवाच नष्ट करण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या या भाेंगळ कारभाराविराेधात नाशिककर एकवटले आहे. शनिवारी दि. 10 स्मार्ट सिटीचा निषेध करण्यासाठी गाेदाघाटावर वारसा स्थळांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात येणार आहे.

गाेदापात्रातील दुतोंड्या मारुती सांडव्यापासून ते खंडाेबा कुंड या दरम्यान काॅक्रींट काढण्याचे काम करण्यात आले. हे काम करतांना सांडव्यावरील देवी मंदिरामागे असलेला पुरातन सांडवा ताेडण्यात आला.याच बराेबर यशवंत महाराज पटागंणाच्या बाजूने गाेदापात्राकडे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या देखील काही महिन्यापूर्वी ताेडण्यात आलेल्या हाेत्या.तर दुसरीकडे नीलकंठेश्वर मंदिराच्या परिसरात थेट जेसीबी लावत कामे केल्यामुळे अनेक मंदिरांना तडे गेले आहेत.याबाबत अनेकदा तक्रारी करुनही स्मार्ट िसटीकडून या कडे साेईस्कर दुर्लक्ष केले जात आहे.

स्मार्ट सिटीद्वारे सुशाेभिकरणाच्या नावाखाली पुरातन स्थळांचे नुकसान केले जात असल्याने यामुळे नाशिककरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभुमीवर राज्यशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी अनाेखे आंदाेलन केले जाणार आहे. समस्त नाशिककर, गाेदाप्रेमींकडून गाेदाघाटावरील तुटफूट झालेल्या वारसा स्थळांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात येणार आहे. यात नाशिककरांनी माेठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयाेजकांच्या वतीने करण्यात आले अाहे.

स्मार्टसिटीला गाेदेचे पाणी दाखविण्याची वेळ

स्मार्टसिटीकडून एकाप्रकारे पुरातन वारसा स्थळांची हत्याच केली जात आहे. पुनबांधणीचे केवळ आश्वासन दिले जात असून काेणत्याही प्रकारची कृती केली जात नाही. यामुळे स्मार्टसिटीच्या मुजाेर अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने गाेदेचे पाणी दाखविण्याची वेळ आली आहे.याचमुळे हत्या झालेल्या वारसा स्थळांना श्रध्दाजंलीचा कार्यक्रम आयाेजन करण्यात आले.-देवांग जानी, अध्यक्ष, गाेदाप्रेमी सेवा समिती

बातम्या आणखी आहेत...