आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेचे काम थंड बस्त्यात:देवस्थान जमिनींच्या मोबदल्याचा प्रश्न अनुत्तरीत, राज्यातील सत्तांतरासह अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा परिणाम

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी जमीन संपादनाच्या कामाला गत तीन महिन्यांपासून ब्रेक लागला आहे. राज्यात झालेले सत्तांतर तसेच महारेलच्या नाशिक स्थित अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे जमीन-खरेदीची प्रक्रीयाही थांबली आहे. त्यामुळे शहरातील देवस्थान आणि इमानी जमीनींचाही मुद्दा अद्याप निकाली निघाला नसल्याने हायस्पीड रेल्वे मार्गाचं कामही थंडावलं आहे.

मविआ काळात वेगाने काम

फेब्रुवारी-मार्च महिन्यात केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेटमध्ये नाशिककरांना दिलासा देताना नाशिक-पुणे या हायस्पीड रेल्वे मार्गासाठी स्वंतत्र निधीची तरतूद केली. त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकारनेही त्यासाठी वेगाने प्रकल्प पुर्तीसाठी प्रयत्न सुरु केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: बैठका, व्हीसींतून जमीन संपादनासह अडचणीही बऱ्यापैकी सोडविल्या.

आता विलंब होण्याची शक्यता

मुळ प्रश्न असलेल्या नाशिक शहरातील विहीतगाव, देवळाली, शिंगवे बहुलासह इतर गावांच्या देवस्थान आणि इनामी जमीनींचाही मुद्दा सोडविण्यास सुरुवात केली होती. पण याच काळात राज्यातील सरकार पडले अन् नवे शिंदे सरकार स्थापन झाले. या प्रक्रीयेत बराच वेळ गेला असून, यादरम्यान महारेलचे नाशिकचे अधिकारीही बदलले आहे. त्यामुळे जमीनींचे मुल्यांकन जाहीर होऊनही संपादनाची प्रक्रीया पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाचे कामही थांबले आहे. प्रत्यक्षात ऑक्टोबरनंतर मार्ग उभारणीचे कामही सुरु करावयाचे होते. पण आता तीन महिन्यांपासून सारं ठप्प झाल्याने प्रकल्पापुर्तीलाही विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महारेलकडून प्रतिसाद नाही

याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी सांगितले, देवस्थानच्या जमीनींचा मोबदला देवस्थान किंवा कसत असलेल्या शेतकरी यापैकी कुणाला द्यायचा याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. शासनाकडून कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. तसेच भू-संपादनासाठी आमची यंत्रणा तयार आहे, पण महारेलकडून अपेक्षित प्रतिसादच मिळत नसल्याने हे काम सध्या थांबले आहे.

बातम्या आणखी आहेत...