आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त वक्तव्य:नाशिकराेडला राज्यपालांचा सर्वपक्षीयांनी केला निषेध ; राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी

नाशिकरोड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकरोड येथे सर्वपक्षीयांंनी निषेध करत ‘राज्यपाल कोश्यारी चले जाव’चा नारा दिला. साने गुरुजीनगर येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मनसेचे रोहन देशपांडे यांनी दुग्धाभिषेक, मंत्रपठण, आरती, पुष्पहार अर्पण केला आणि राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी जान्हवी व प्रणाली सोनावणे यांनी जिजामातेची वेशभूषा करून महाराजांप्रति आदरभाव व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती अरिंगळे, प्रशांत दिवे, रोहन देशपांडे, संतोष सहाणे, विक्रम कदम , प्रमोद साखरे, प्रशांत गांगुर्डे, रोशन आढाव हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...