आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसफेरी उपलब्ध:नाशिकराेड ते गंगापूर सिटीलिंक बस

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिटीलिंकच्या वतीने प्रवाशांकडून होणारी मागणी लक्षात घेता नवीन मार्ग क्रमांक २४२ सुरू करण्यात आला आहे. नाशिकरोड ते गंगापूर गाव मार्गे शालिमार, अशोकस्तंभ, गंगापूररोड तसेच गंगापूरगाव ते नाशिकरोड मार्गे गंगापूररोड, अशोकस्तंभ, शालिमार असा हा मार्ग असणार आहे. नाशिकरोड ते गंगापूर गावसाठी ७.१५, ९.४५, १६.२५, १८.४५, २१.४५ वाजता तर गंगापूरगाव ते नाशिकरोडसाठी ६.००, ८.३०, ११.००, १७.३०, व २०.०० वाजता बसफेरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मुख्य म्हणजे या बसफेऱ्यांना पंचवटी कनेक्शन देण्यात आलेले आहे. पंचवटी एक्स्प्रेसच्या वेळेनुसार गंगापूरगाव येथून नाशिकरोडसाठी सकाळी ६.०० वाजता बस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर रात्री पंचवटी एक्स्प्रेसच्या वेळेनुसार नाशिकरोड ते गंगापूर गावसाठी २१.४५ वाजता बसफेरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईसाठी अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची देखील यामुळे सोय होणार आहे.तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी या बसफेऱ्यांचा लाभ घेण्याचे आवाहन टीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...