आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंदू बाबाचा महिलेवर 5 वर्ष बलात्कार:घर घेऊन देण्याच्या आमिषाने 5 लाख उकळले; संशयितावर गुन्हा दाखल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दैवी शक्ती असल्याने सांगत विवाहित महिलेवर भोंदू बाबाने 5 वर्ष बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकच नव्हे तर तुला घर घेऊन देतो असे आमिष दाखवत महिलेची 5 लाखांची फसवणूक केली.

दरम्यान, याप्रकरणी भोंदू बाबा विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देव बाबा आणि त्याच्या पत्नीसह मुलाच्या आणि मुलीच्या विरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेकडून उकळले 5 लाख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिते विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 2018 पासून जयाबाई कॉलनी नाशिकरोड येथे राहणाऱ्या संशयित विष्णू वारुंगसे उर्फ देव बाबा याच्या संपर्कात आहे. घरी पतीसोबत पटत नसल्याने बाबा जडीबोटी देत घरातील पीडा दुर करतो असे कुणीतरी सांगीतले होते. या माहितीच्या अधारे पीडीत विवाहिता बाबाकडे आली होती. देवबाबा ने महिलेच्या सर्व समस्या एकून घेत तीच्या मानसिकतेचा फायदा घेत महिलेला मानसिक धीर देत पुजा करण्याचा बहाणा करत तीला नाशिकरोड परिसरात भाडेकरारावर खोली घेऊन दिली. येथे पुजा करण्याचा बहाणा करत बाबाने महिलेवर बलात्कार केला. महिलेने नकार दिला तर माझ्याकडे दैवी शक्ती आहे. तुला तुझा नवरा परत मिळवून देईल तसेच स्वताचे घर घेऊन देण्याचे अमिष देत महिलेकडून 5 लाख रुपये घेतले.

महिलेला धमकावले

पाच वर्षापासून संशयित बाबा महिलेवर अत्याचार करत होता. पीडित महिलेने बाबाकडे घर कधी देणार घर नाही तर पैसे तरी परत द्या अशी मागणी केली असता, बाबाने महिलेला धमकी देत ब्लॅकमेले केले तुझे आणि माझे संबध असल्याचे सर्वांना सांगेल अशी धमकी देत पैसे परत करण्यात नकार दिला. पीडित महिलेला तीच्या कुटुंबियांना मदत करण्यात नकार दिल्यानंतर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. वरिष्ठ निरिक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. भोंदू बाबाने महिलेला जातीवाचाक शिविगाळ करत तीला धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे संशयितांच्या विरोधात अॅट्रोसीटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...