आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविवाहित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. असे असताना संबंधित तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवत तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या संबंधामुळे पीडित मुलगी गर्भवती राहून तिचा अनाधिकृतपणे गर्भपात केल्याने संशयित आरोपीवर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोहेब जाफर खान (रा. विहितगाव ) असे आरोपीचे नाव आहे.
काय आहे घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, परिसरात राहणार ओळखीचा तरुणासोबत 2020 मध्ये कोरोना काळात प्रेमसंबध निर्माण झाले.संशयित जोहेब याने पिडीत युवतीला त्याच्या राहते इमारतीमध्ये मोकळ्या आवारात आणि फ्लॅट मध्ये बोलवून माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या सोबत लग्न करायचे आहे असे सांगून पीडित युवतीचा विश्वास संपादीत केला. पीडित युवतीला संशयिताच्या प्रेमावर विश्वास बसल्याने तीने होकार दिला. याचा गैरफायदा घेत संशयिताने पीडितेवर त्याच्या राहते घरी बलात्कार केला.
अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल
यासंबधाचे अश्लिल फोटो, व्हिडीओ मोबाईल मध्ये नकळत काढून ठेवले. पिडीतेने लग्न करण्यासाठी विचारले असता संशयित काही तरी बहाणे करत वेळ मारुन नेत पीडितेवर अत्याचार करत होता. यासंबधातून पीडित युवती दोन वेळा गर्भवती राहिली. संशयिताने ओळखीच्या मेडीकल मधून गर्भपाताचे ओषध आणून पीडित युवतीला बळजबरीने देत दोन वेळा अनाधिकृतपणे गर्भपात केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला पोलिसांनी अटक केली. सहायक आयुक्त सोहल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
जातीवाचक शिविगाळ
संशयिताने पीडित युवतीला जातीवाचक शिविगाळ तिला लग्नाचे आमिष देत तीच्यावर अत्याचार केला. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर संशयिताच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात संशयिताला अटक करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.