आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेराेनानंतरच्या काळात नाशिकमध्ये रिअल इस्टेट सुसाट असून 1 एप्रिल ते नाेव्हेंबर 2022 पर्यंतच्या अवघ्या 8 महिन्यांंच्या काळात नाशिकमध्ये 1 लाख 1 हजार 200 दस्त नाेंदले गेले आहेत. विशेष म्हणजे, 2021-22 या आर्थिकवर्षातील 12 महिन्यात 1 लाख 37 हजार 667 व्यवहारांची दस्त नाेंदणी झाली हाेती. विशेष म्हणजे, यावर्षी 8 महिन्यातच मु्द्रांक शुल्कापाेटीच्या 1050 काेटींच्या उद्दिष्टापैकी 91 टक्क्यावर उद्दिष्ट तीन महिने अगाेदरच पुर्ण झाले आहे.
राज्य शासनाच्या कर वसुलीतील माेठा हिस्सा मालमत्तांच्या खरेदी विक्रीच्या दस्तनाेंदणीतून मुद्रांक शुल्काच्या रुपाने मिळत असताे. काेराेना काळात याचमुळे राज्य शासनाने या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कामध्ये अगाेदर तीन टक्के त्यानंतर दाेन टक्के सवलत दिली हाेती. याचा चांगला परिणाम त्या काळात पहायला मिळाला. यानंतर मात्र रियल इस्टेटला शहरात बुस्ट मिळाला असून शहरात विविध संस्थांकडून भरविण्यात आलेली प्राॅपर्टी प्रदर्शनेही याकरीता पुरक ठरली आहेत. नाशिकमध्ये घर खरेदीचे स्वप्न माेठ्या प्रमाणावर लाेक पुर्ण करीत असल्याचे या आकडेवारीवरून समाेर आले आहे.
2 वर्षातील दस्त नाेंदणी आणि महसुलावर दृष्टीक्षेप
2021-22 करीताचा इष्टांक हाेता- 1037 काेटी
मार्च 2022 अखेर दस्तनाेंदणी झाली - 1,37,667
मार्च 2022 अखेर शासनाला मिळाला महसुल - 1126.36 काेटी
उद्दिष्टाच्या तुलनेत वसुलीची टक्केवारी - 108.62 टक्के
2022 ते 2023 करीताचा इष्टांक आहे - 1050 काेटी
नाेव्हेंबर 2023 अखेरच एकुण दस्तनाेंदणी- 1,01,200
डिसेंबर 2022 अखेर एकुण वसुली - 957.62 काेटी
एप्रिल 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीमधील वसुलीची टक्केवारी 91.20 टक्के
रियल इस्टेटमध्ये तेजीचे वातावरण
नाशिक मध्ये मोठ्या घरांची तसेच प्लॉटला देखील मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रिअल इस्टेट मध्ये खऱ्या अर्थाने तेजीचे वातावरण असून शेल्टर प्रदर्शनानंतर मोठ्या प्रमाणावर लोक साईट व्हिजिट करत आहेत, बुकिंग होत आहेत. यामुळे पुढच्या चार महिन्यात मागील वर्षीचे रेकॉर्ड नक्कीच ब्रेक होणार आहे.
- रवी महाजन, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक
किमान दहा टक्के वाढ अपेक्षित
नरेडकोने भरविलेल्या होमेथॉन प्रदर्शनात 350 फ्लॅट बुकिंग आतापर्यंत झाली आहे, त्यांचे रजिस्ट्रेशन एक दोन महिन्यात होईल. इतकेच नाही तर या प्रदर्शनामुळे मोठ्या प्रमाणावर साईट विजिट सुरू असून पुढील किमान तीन महिने व्यवहार होत राहतील. यामुळे गतवर्षाचे दस्त नोंदणीचे मुद्रांक शुल्क वसुलीचे रेकॉर्ड यंदा तुटेल. किमान दहा टक्क्यांनी यात वाढ अपेक्षित आहे.
- अभय तातेड, अध्यक्ष, नरेडको नाशिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.