आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नाशिककरांनी साधला दोन वर्षांनंतर अक्षय्य खरेदीचा मुहूर्त; सोने खरेदी, वाहन डिलिव्हरीचा उत्साह: रिअल इस्टेटमध्येही चैतन्य, इलेक्ट्रिक होम अप्लायन्सेसचीही खरेदी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल दोन वर्षे कोरोनाच्या लाटेमुळे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधता न आलेल्या नाशिककरांनी मंगळवारी मात्र या मुहूर्तावर मनसोक्त खरेदी केल्याचे चित्र पहायला मिळाले. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रमजान ईद आल्याने असलेली सार्वजनिक सुटी, लग्नसराई आणि कमी झालेले सोन्याचे दर यामुळे सकाळपासूनच सोने खरेदीला गर्दी होती.

इलेक्ट्रिक व्हेईकल आणि सीएनजी कार खरेदीचा ट्रेंड दिसून येत असून मनपसंत मॉडेल उपलब्ध नसल्याने बहुतेकांना मुहूर्तावर कार बुकिंग करून समाधान मानावे लागले. रिअल इस्टेटमध्येही चैतन्याचे वातावरण होते. दिवसभरात किमान ३०० फ्लॅट्सच्या बुकिंगची शक्यता आहे. मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल झाली.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी केलेल्या वस्तूचा कधीही क्षय होत नाही असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी गुंजभर का होईना सोने खरेदी पारंपरिकरित्या केली जाते. याशिवाय स्वप्नातील घर, ऑफिसेस, जमीनजुमला, कार, मोटारसायकल इलेक्ट्रिक होम अप्लायन्सेस यांची खरेदी आवर्जून केल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...