आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क’:नाशिककरांनी बनवली देशातील सर्वात वेगवान डेटा, ऑडिओ, व्हिज्युअल सेवा पुरवणारी सुविधा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईएसडीएसच्या टीमची निर्मिती, हानिकारक वेब ट्रॅफिक रोखण्यासाठीही उपयुक्त

ईएसडीएस या भारतातील मॅनेज्ड डेटा सेंटर व क्लाऊड होस्टिंग सेवा पुरवठादार कंपनीने ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांना अनुसरून आणखी एक सेवा प्रस्तुत केली आहे. ‘एन्लाइट कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क (सीडीएन)’च्या साहाय्याने वेबवर आधारित कंटेंट विजेच्या वेगाने भारतात कुठेही पोहोचवणे यामुळे सहजशक्य होणार आहे. त्यासाठी ईएसडीएस भारतभर विस्तारलेल्या डेटा सेंटर्सच्या नेटवर्कचा उपयोग करून घेत आहे.

या सुविधेला ‘एन्लाइट डब्ल्यूएएफ’ (वेब अॅप्लिकेशन फायरवॉल) आणि ‘व्हीटीएमस्कॅन’ (वेबसाइट सिक्युरिटी स्कॅनर) यांचे संरक्षण प्राप्त असून याचा विकास भारतातच ईएसडीएसच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमद्वारा करण्यात आलेला आहे. ईएसडीएस एन्लाईट वेब अॅप्लिकेशन फायरवॉल (डब्ल्यूएएफ) हे भारतात विकसित करण्यात आलेले क्लाऊड होस्टेड वेब अॅप्लिकेशन फायरवॉल असून त्यामुळे कंपन्या त्यांच्या वेबसाइट्सवर नको असलेले आणि संभवतः हानिकारक वेब ट्रॅफिक येण्यापासून रोखू शकतात. त्याचबरोबरीने त्यांना ओडब्ल्यूएएसपी सर्वाधिक १० धोक्यांपासूनदेखील संरक्षण मिळते. ईएसडीएस व्हीटीएमस्कॅन (वेबसाइट सिक्युरिटी स्कॅनर) यामुळे कंपन्यांना भरपूर आणि व्यापक संरक्षण अनुभव मिळतो, वेबवरील त्यांच्या उपस्थितीला २४x७ संरक्षण पुरवले जाते. असुरक्षिततेचे प्रभावी व्यवस्थापन करून हॅकर्सना वेबसाइटपासून दूर ठेवले जाते.

‘एन्लाइट सीडीएन’ची वैशिष्ट्ये
- वेब पोर्टल्स, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स, न्यूज अॅप्स आणि यूजीसी अर्थात युजर-जनरेटेड कंटेंटसाठी वापरली जाणारी अॅप्लिकेशन्स यासाठी वेबसाइट अॅक्सिलरेशन.
- फाइल डाऊनलोड अॅक्सिलरेशन - डाऊनलोडिंग क्लायंट्स, गेम्स, स्टोअर्समधील अॅप व एचटीटीपी किंवा एचटीटीपीएसवर आधारित डाऊनलोड सेवा देणाऱ्या वेबसाइट्ससाठी उपयुक्त
- ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या वेबसाइट्स, व्हिडिओ शेअरिंग वेबसाइट्स, इंटरनेट व्हिडिओ-ऑन-डिमांड प्लॅटफॉर्म्स, अॅप्स व अशा अनेक प्रकारचे व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक ऑन-डिमांड ऑडिओ-व्हिज्युअल सेवा पुरवणाऱ्यांसाठी उपयोगी.

बातम्या आणखी आहेत...