आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेला आली जाग:आजपासून विनापरवानगी रस्ते‎ फोडल्यास थेट फौजदारी गुन्हा‎, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक ताकीद‎

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक‎ पाच वर्षांत तयार केलेल्या १२०० कोटींचे‎ रस्ते गेल्या खड्ड्यात गेल्याचे बघून आता‎ महापालिकेच्या बांधकाम विभागाने गुरुवार‎ (दि. ११)पासून एमएनजीएलसह खासगी‎ कंपन्या तसेच इतर कोणालाही रस्ते‎ फोडण्यावर बंदी घातली आहे.

त्यानंतरही‎ काेणी रस्ते फोडताना आढळल्यास‎ त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल‎ करण्याचा इशारा शहर अभियंता‎ शिवकुमार वंजारी यांनी दिला आहे.‎ त्यामुळे शहरातील सहाही विभागातील‎ बांधकाम अधिकाऱ्यांना डाेळ्यात तेल‎ घालून काम करावे लागणार आहे.‎

नक्की प्रकरण काय?

गेल्या पावसाळ्यात नाशिककरांचे प्रचंड‎ हाल झाले हाेते. जुने तर सोडा, मात्र नवीन‎ चकचकीत रस्ते फोडले गेल्यामुळे संताप‎ व्यक्त होत होता. पावसाळा लांबल्यामुळे‎ कायमस्वरूपी दुरुस्ती करता येत नसल्यामुळे‎ खड्ड्यातून वाहने दामटताना नाशिककरांची‎ हाडे खिळखिळी झाल्यागत अवस्था होती.‎

पालिकेवर झालेली टीका लक्षात घेत यंदा‎ ताकही फुंकून पिण्याचा निर्णय प्रशासनाने‎ घेतला. त्यानुसार महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी‎ वा मोबाइल कंपन्या किंबहुना अन्य खासगी‎ संस्थांना व्यावसायिक कारणास्तव रस्ता‎ खोदायचा असेल तर ३० एप्रिलपर्यंतच मुभा‎ होती.

मात्र, खासगी कंपन्यांनी प्रलंबित कामे‎ पूर्ण करण्यासाठी दहा दिवसांची अतिरिक्त‎ मुदत मागितली होती. त्यानुसार पालिकेने‎ मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा नवीन मुदत‎ मागितली गेली. मात्र, पालिकेने नवीन रस्ते‎ खाेदकामावर बंदी घातली असून अपूर्ण रस्ते‎ २५ मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याची मुभा दिली‎ आहे.‎

थेट फौजदारी गुन्हा

उद्या ११ मेपासून एमएनजीएलसह मोबाईल‎ कंपन्यांसह कोणत्याही खाजगीठेकेदाराने रस्ता‎ खोदल्याचे आढळल्यास संबधितांविरोधात‎ थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अादेशही‎ दिले. केवळ ठेकेदारच नव्हे तर ज्या भागात‎ रस्ता खाेदला जाईल तेथील कार्यकारी‎ अभियंता, उपअभियंता यांनाही जबाबदार‎ धरले जाईल असाही इशारा दिला आहे.‎ शहरात ठिकठिकाणी असे रस्त्यांचे काम सुरूच आहे.‎

पावसाळ्याच्या‎ पार्श्वभूमीवर‎ रस्ते खोदकामास‎ कोणालाही परवानगी‎ दिली जाणार नाही.‎ एमएनजीएलसह‎ खासगी कंपन्याना‎ रस्ते खोदण्यासाठी‎ दिलेली मुदतवाढ‎ बुधवारी (दि. १०)‎ संपुष्टात आली आहे.‎ त्यामुळे गुरुवारपासून‎ रस्ता खोदल्यास थेट‎ गुन्हे दाखल‎ करण्याची कारवाई‎ केली जाईल.‎ - शिवकुमार‎ वंजारी, शहर‎ अभियंता, मनपा‎