आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेट्रोलींग करत असतांना विना नंबरच्या दुचाकीचा पोलिसांना पाठलाग करत दुचाकीवरील तीघांना ताब्यात घेत दुचाकीच्या कागदपत्रांची चौकशी केली असता संशयितांनी श्रीरामपुर येथे एका ढाब्याच्या जवळ उभ्या असलेल्या कारची काच फोडून 6 लाख 42 हजारांची रोकड चोरी केल्याची कबूली दिली.
याप्रकरणी श्रीरामपुर पोलिस ठाण्यात गुरुवार दि. 5 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. रोकड चोरी करुन संशयित नाशिकरोड मार्गे निफाडकडे जात असतांना पथकाच्या हाती लागले.
उपनगर पोलिसांनी मुक्तीधाम नाशिकरोड येथे ही कारवाई केली. संशयित लखन बाळु पवार (रा. निफाड,) श्रीनिवास अशोक बोरजे (रा. पिंपळगाव जलाल,) गौरव राजु पवार (रा. कुंदेवाडी) असे या लुटमार करणाऱ्या संशयित टोळीचे नाव आहे.
काय आहे घटना?
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उपनगर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुक्तीधाम परिसरात गस्त करत असतांना एक विना नंबरची लाल रंगाची दुचाकीहून तीन संशयित जातांना दिसले. पथकाला संशय आला दुचाकी चोरीची असण्याची शक्यता असल्याने पथकाने संशयित दुचाकीचा पाठलाग केला. पोलिस वाहन पाठीमागून येत असल्याने संशयितांनी दुचाकी वेगात चालवत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. पथकाचा संशय बळावला पथकाने अधिक वेगाने संशयित दुचाकीचा पाठलाग करत दुचाकी थांबवली. संशयित दुचाकी सोडून पलायन करत असतांना पथकातील कर्मचाऱ्यांना संशयितांना थोड्याच अंतरावर पाठलाग करुन पकडले. चौकशीत संशयितांना त्यांची नावे सांगीतले. दुचाकीच्या कागदपत्रा बाबात विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीचे उत्तर दिले. दुचाकी कुठून आणली नाशिकरोडला कसे आले याबाबत विचारणा केली. पथकाने सखोल चौकशी केली असता श्रीरामपूर येथील नितू ढाबा प्रभात डेअरी जवळ एका चारचाकी वाहनाची पाठीमागील काच फोडून 6 लाख 42 हजारांची रोकड चोरी केल्याची कबूली दिली.
वरिष्ठ निरिक्षक निलेश माईनकर, विकास लोंढे, संजय ताजणे, विनोद लखन, सुरज गवळी, पंकड कर्पे, राहुल जगताप, संदेश राघतवान यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.