आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यकणा फाउंडेशनचे वाड्मयीन पुरस्कार जाहीर:सुमनताई पंचभाई स्मृती कवितासंग्रह पुरस्कार मनीषा पाटील यांच्या ‘नाती वांझ होताना’ला

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक येथील साहित्यकणा फाउंडेशनतर्फे कविता, कथा, कादंबरी व बालसाहित्य या चार वाड्मय प्रकारातील साहित्यकृतींना देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

यंदाचा सुमनताई पंचभाई स्मृती कवितासंग्रह पुरस्कार मनीषा पाटील हरोलीकर (सांगली) यांच्या ‘नाती वांझ होतांना’ व तन्वी अमित (नाशिक) यांच्या ‘आवर्ती अपूर्णांक’ या दोन कवितासंग्रहास जाहीर झाला. मीराबाई गोराडे स्मृती कथासंग्रह पुरस्कार प्रा. यशवंत माळी (सांगली) यांच्या ‘उलघाल’ व पुष्पा चोपडे (नाशिक) ‘मन न्यारं रे तंतर’ या दोन कथासंग्रहास जाहीर झाला.

बालसाहित्य पुरस्कार ‘सुरस धातू गाथा’ला

शिलाताई गहिलोत-राजपूत कादंबरी पुरस्कार नीरजा (मुंबई) ‘थिजलेल्या काळाचे अवशेष’ या कादंबरी निवड करण्यात आली आहे तर राहुल पाटील स्मृती बालसाहित्य पुरस्कार ‘सुरस धातू गाथा’ या साहित्यकृतीसाठी प्रा. डॉ. सुनील विभूते यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे साहित्यकणाचे अध्यक्ष संजय द. गोराडे यांनी जाहीर केले आहे.

एकदिवशीय राज्यस्तरीय साहित्यकणा संमेलन युवा साहित्य अकादमी विजेते ऐश्वर्य पाटेकर यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे, वरील पुरस्कारार्थींना या संमेलनात रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात येईल. 12 फेब्रुवारीला समर्थ मंगल कार्यालय, कॅनडा कॉर्नर, डोंगरे वसतिगृह येथे होणार असल्याची माहिती सचिव विलास पंचभाई दिली. या प्रतूषे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऐश्वर्य पाटेकरांची उपस्थिती

राज्यस्तरीय साहित्यकणा संमेलन युवा साहित्य अकादमी विजेते ऐश्वर्य पाटेकर यांच्या उपस्थितीत य पुस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठीच राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने सहित्यकांची निवड करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती.

ज्येष्ठ कलावंत, साहित्यिक राहणार उपस्थित

या समितीत बाल साहित्यिक कथा कादंबरी या वाड्मय वाघमारे साहित्याचे निवड करण्यात आली आहे. यामध्ये राज्यभरातील साहित्याचा देखील समावेश होता. अतिशय प्रतिष्ठेचे मानल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी अनेक ज्येष्ठ कलावंत, साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.

यांना मिळाले पुरस्कार

बातम्या आणखी आहेत...