आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक अखिल भारतीय प्रकाशक संघातर्फे दोन दिवसीय लेखक-प्रकाशन साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी (दि. ६) सकाळी १० वाजता कुसुमाग्रज स्मारकात होत आहे. शनिवार आणि रविवार दिवसभर साहित्यमंथन होणार आहे. यात सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम आणि ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या प्रकट मुलाखती होणार आहेत.
अशोक कोठावळे यांच्या अध्यक्षतेखालील या संमेलनात कोठावळे आणि रामदास भटकळ यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर आणि विलास पोतदार यांनी सांगितले.
असे होणार संमेलन
शनिवार, दि. ६ मे : सकाळी १० वा. संमेलनाचे उद्घाटन, प्रमुख अतिथी : छगन भुजबळ, प्रमुख पाहुणे माजी संमेलनाध्यक्ष रवींद्र गुर्जर, बी. जी. शेखर. याचवेळी नायगावकर यांचा अमृत महाेत्सवानिमित्त सत्कार.
दुपारी १२. वा. लेखक, वक्ते मिलिंद जाेशी हे नायगावकरांची मुलाखत घेणार. दुपारी ३ वा. ‘प्रकाशन व्यवसायापुढील अाव्हाने’ या विषयावर शरद गाेगटे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद - सहभाग शरद गाेगटे, विनाेद शिरसाठ, अमृता कुलकर्णी, सुनीता राजे-पवार, अशाेक मुळे, राेहन चंपानेरकर, स्वानंद बेदरकर, प्रवीण जाेंधळे, दुपारी ४ वा. कुसुमागज्र ते तात्यासाहेब या विषयावर परिसंवाद, हेमंत टकले, प्रा. डाॅ. दिलीप धाेंडगे, लाेकेश शेवडे, रेखा भांडारे यांचा सहभाग. सायंकाळी ५. ३०. वा. दिवाळी अंक बदलताे आहे या विषयावर परिसंवाद सहभाग प्रा. एकनाथ पगार, अपर्णा वेलणकर, अरुण शेवते, प्रा. डाॅ. शंकर बाेऱ्हाडे, हेमंत पाेतदार, सुभाष सबनीस. सायं. ६.३० वा. सुमती पवार यांच्या अध्यक्षतेखाली पहिले कविसंमेलन.
दुसरे कवी संमेलन रविवार दि. ७ मे : सकाळी १० वा. जीवनगाैरव पुरस्कार साेहळा दुपारी १२ वा. विश्वास ठाकूर घेणार अॅड. उज्ज्वल निकम यांची मुलाखत दुपारी ३ वा. जनस्थानातील साहित्य परंपरा विषयावर परिसंवाद. सहभाग सुरेश भटेवरा, वैशाली बालाजीवाले, वंदना अत्रे, मृदुला बेळे, प्रशांत पाटील, राहुल रनाळकर, वसंत खैरनार दुसारी ४.३० वा. पालकमंत्री दादा भुसे, अॅड. नितीन ठाकरे, प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांच्या उपस्थितीत समाराेप
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.