आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्तशृंगी गडावरील दानपेटी फोडली:सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना लावत केली रोकड लंपास; 20 दिवसांनंतरही गुन्हा दाखल नाही

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरात चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे मंदिर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांना चुना फासत ही रोकड लंपास केली आहे. विशेष म्हणजे गेल्या 20 दिवसांपूर्वी ही चोरी झाली असली तरी अजूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

दरम्यान पंढरपुरात द्राक्षांची आरास केली असता थोड्याच वेळात ती चोरीला गेल्याची घटना ताजी असताना ही घटना उघड झाली आहे. सप्तशृंगी मंदिर परिसरात अेनक ठिकाणी दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. यातील एका दानपेटीवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समोर आले आहे. दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत.

अत्यंत निंदनीय प्रकार

विश्वस्त दीपक पाटोदकर म्हणाले की, सप्तशृंगी देवी मंदिराच्या परिसरात दानपेटीतून पैसे चोरीचा घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणी चौकशी व्हायला हवी, मंदिर परिसरात सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही असताना मंदिराच्या दान पेटीतून पैसे चोरीला जातात हा गंभीर प्रकार आहे. सुरक्षा रक्षकांना इतक्या मोठ्या प्रमाणावर पगार देऊन सुरक्षा महामंडळाकडून घेतलेल्या सुरक्षा रक्षकांचा काय फायदा असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...