आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक वर्षाचे स्वागत:पहिली ते आठवीच्या 4 हजार 235 शाळांतील सुमारे 5 लाख विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पुस्तके

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर यंदा नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाणार असून विद्यार्थ्यांचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्याच्या सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहे. बुधवार 15 जूनपासून शाळा उघडणार असून पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या 4 हजार 235 शाळांतील सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. पुस्तकांबरोबर गणवेशाचे वाटप केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन वाजत गाजत स्वागत केले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनाच्या नियमांचे पालन करत हा प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी दिली.

जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सुमारे पाच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पुस्तके वितरित केले जाणार आहे. त्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून पुस्तकांचे वितरण सुरू आहे. यात मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी माध्यमांसह एकात्मिक पाठ्यपुस्तकांचाही समावेश आहे. पावसाळ्यात पुस्तकांच्या वितरण अडचण येऊ नये याची खबरदारी शिक्षण विभागाकडून घेण्यात आले आहे. पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमाच्या 4 लाख 12 हजार तर उर्दू माध्यमाच्या सुमारे 8 हजार हिंदी माध्यमाच्या पात्र विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येणार आहे. पहिली ते सातवीच्या 68 हजार 228 विद्यार्थ्यांना एकात्मिक पुस्तके देण्यात येणार आहे.

शाळाबाह्य मुलांचा शोध

कोविडमुळे गेली दोन वर्ष शाळा बंद होत्या. ऑनलाइन शिक्षणात अडचणी आल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेली. आता मात्र, कोविडचा संसर्ग कमी झाल्याने ऑफलाइन शाळा सुरू होत आहे. त्यामुळे 6 ते 14 वयोगटातील तसेच इतर शाळाबाह्य झालेल्या मुलांचा शोध घेण्याच्या सूचना शिक्षण विभागातर्फे मुख्याध्यापक व शिक्षकांना करण्यात आल्या आहे. शाळापूर्व तयारीच्या कालावधीत या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याचे प्रवेश पूर्ण करावे. दगडखाणी, वीटभट्टी, बांधकामाचे स्थळ, उद्याने, बाजार पेठा, पदपथ, सिग्नल, कुटीर उद्योग, कामगार वस्त्या या ठिकाणी शाळाबाह्य मुले असण्याची शक्यता असून येथे शोध घेण्यात येणार आहे.

नियमांचे पालन अनिवार्य

  • दोन विद्यार्थ्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग
  • मास्क परिधान करणे अनिवार्य
  • सॅनिटायझरचा वापर
  • शाळेतील वर्ग खोल्या व शालेय प्रांगणाची स्वच्छता
  • थर्मल स्क्रीनिंगने विद्यार्थ्यांची तपासणी
बातम्या आणखी आहेत...