आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिप्लोमा फार्मसीसाठी उद्या दुसरी निवड यादी:पहिल्या फेरीत पसंतीचे कॉलेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष यादीकडे

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीनंतरच्या डिप्लोमा फार्मसी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या फेरीसाठी शुक्रवारी दि. 16 डिसेंबरला निवड यादी जाहीर होणार आहे. पहिल्या फेरीत पसंतीचे काॅलेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष आता दुसऱ्या यादीकडे लागले आहे. बी. फार्मसीप्रमाणेच डिप्लोमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

डी. फार्मसी प्रवेश अर्ज नोंदणी प्रक्रिया जून महिन्यात सुरु झाली होती. त्यानंतर वारंवार मुदतवाढ देण्यात आली. तब्बल पाच ते सहा महिने केवळ प्रवेश अर्जांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरु होती. अखेर डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानुसार 8 डिसेंबरपर्यंत पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यासाठी मुदत होती. तर 9 डिसेंबरला निवड यादी झाली. त्यात संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 12 डिसेंबरपर्यंत संधी देण्यात आली होती. त्यानंतर 13 डिसेंबरला रिक्त जागांचा तपशील जाहीर झाला. 14 व 15 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांनी पसंतीच्या काॅलेजचे ऑप्शन भरले. आता 16 डिसेंबरला दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर होऊन त्यात संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना 17 ते 19 पर्यंत प्रवेशाची संधी असेल. दुसऱ्या फेरीनंतर तिसऱ्या कॅप राउंडची प्रवेश प्रक्रिया होईल.

दोन हजारांहून अधिक जागा

नाशिकमध्ये डिप्लोमा फार्मसी अभ्यासक्रमाची 32 महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांत सुरुवातीला 1800 जागा उपलब्ध होत्या. गेल्या तीन ते चार वर्षांपासून फार्मसीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याने या महाविद्यालयांतील जागांमध्येही वाढ झाली आहे. दोन हजारांहून अधिक जागा यंदा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. पहिल्या कॅप राउंडनंतर आता प्रवेशासाठी एकूण दुसरा व तिसरा कॅप राउंड होईल. त्यानंतर महाविद्यालयीन स्तरावरील जागा भरल्या जातील. प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने प्रथम सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आवाहन महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांपुढे असेल.

बातम्या आणखी आहेत...