आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंबड ते मुंबई अर्धनग्न मोर्चा स्थगित:अंबड पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी झाले होते आक्रमक

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी या मागणीसाठी नाशिक ते मुंबई मंत्रालय अर्ध नग्न पायी मोर्चा मंगळवारी सकाळी निघाला होता. या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित झाले होते. येथील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस ठाणे व्हायलाच हवे यासाठी हा मोर्चा होता. मोर्चा सुरू होताच आमदार सीमा हिरे यांनी मध्यस्थी करीत पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घालून देत पोलिस ठाण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

अंबड औद्योगिक वसाहती साठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्मिती करावी या मागणीसाठी मंगळवारी सकाळी सामजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, माजी नगरसेवक राकेश दोंदे, रामदास दातीर सह ग्रामस्थ जमा झाले. या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या नंतर अंबड एक्सलो पाईन्ट येथुन मुंबई कडे रवाना झाले. पुढे महामार्गावर गरवारे पॉईन्ट येथे मोर्चेकरांची आमदार सीमा हिरे यांनी भेट घेतली. व मोर्चे करांना चर्चे साठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्या कडे शिष्टमंडळ घेऊन गेले.पालकमंत्री दादा भुसे यांनी मोर्चेकरी शिष्टमंडळाशी चर्चा केली. नवीन पोलिस ठाणे निर्मिती साठी काही त्रुटी लागल्या होत्या त्या त्रुटी पुर्ण करून पुन्हा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. तसेच बुधवारी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पोलिस ठाणे निर्मितीचा विषय मार्गी लावतो असे आश्वासन दिले. या वेळी आमदार सीमा हिरे, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, माजी सभागृह नेते दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

तर 15 पुन्हा दिवसांत यापेक्षा मोठा मोर्चा

दत्तनगर चुंचाळे परिसरात गुन्हेगारी वाढल्याने अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहती साठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्मिती करावी या मागणीसाठी हा मोर्चा निघाला होता. पालकमंत्र्यांनी हा पोलिस ठाणे निर्मितीचा विषय मार्गी लावतो असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित केला आहे. परंतु पंधरा दिवसांत पोलिस ठाणे निर्मिती झाली नाही तर पुन्हा मुंबई येथे अंबड पासुन पायी अर्ध नग्न मोर्चा काढणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, राकेश दोंदे, रामदास दातीर यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...