आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटाचा उद्धव गटावर पलटवार:डोक्यात खोकी भरलेल्यांना अर्थकारणाशिवाय काय समजणार?

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांची जहरी टीका - Divya Marathi
माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांची जहरी टीका

नाशिकच्या विकासासाठीच आम्ही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये गेलो मात्र ज्यांच्या डोक्यात कायम।खोकी घुसलेली आहे त्यांना कोण समजावणार असा आरोप करतमाजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी बाळासाहेबांची शिकवण लक्षात घेऊनच दुसऱ्यांवर आरोप करावे आणि निष्ठावंत असतानाही विजय करंजकर यांच्यावर पक्षातील तथाकथित सिल्वर ओकशी संबंधित नेत्यांनी कसा अन्याय केला हा इतिहासही लक्षात घ्यावा असा टोला लगावला.

शिंदे गटात गेल्यानंतर बोरस्ते यांच्यासह अकरा नगरसेवकांवर शिवसेना नेत्यांनी गंभीर आरोप केले होते. त्यास उत्तर देताना बोरस्ते म्हणाले की, नाशिकच्या विकासासाठी आम्ही पक्षप्रवेश केला. गेल्या वर्षभरापासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट असून मागील काळात आम्ही केलेल्या कामांचा पाठपुरावा करणे तसेच विविध विकासकामांना पूर्णत्वास नेणे व नवीन कामांना गती देऊन समृद्ध नासिक घडवणे हे आमचे ध्येय आहे.

तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील लहान लहान शहरांचा नियोजनबद्ध विकास करणे हा ध्यास होता, हेच बाळकडू आम्हाला मिळाल्यामुळे एकमेकांचे पाय खेचण्याच्या राजकारणात न पडता आम्ही देखील त्याच वाटेने समृद्ध नाशिक साठी नवा झेंडा हाती घेतला आहे. मात्र ज्यांच्या डोक्यात कायम 'खोकेच' भरले आहे, आणि ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी युती तोडून आघाडी केली, वर्षानुवर्ष यांच्याशी संघर्ष केला त्यांच्याच गळाभेटी घेणाऱ्यांना बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीची आठवण कशी राहील.

गुणवत्तेमुळे मला पदे मिळाली

बोरस्ते पुढे म्हणाले की , दहा वर्षात मला पक्षाने भरभरून दिले आणि त्यानंतरही मी गद्दारी केली अशी माझ्यावर टीका करण्यात आली. पक्षाने मला खरंच भरभरून प्रेम दिले. मात्र पक्षाने हे सर्व करताना गुणवत्ता हा एकमेव निकष बघितला. ही गुणवत्ता माझ्यामध्ये होती म्हणून मलाही पदे मिळू शकली याची जाणीव कदाचित माझ्यावर आरोप करणाऱ्यांना नसेल. आयोधेतील शरयू नदीच्या तीरावरील महाआरती असेल, उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे शेतकरी अधिवेशन अशा नानाविध जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळे खुद्ध उद्दव साहेबांनी माझी पाठ थोपटली होती.

करंजकरामागचा बोलवता धनी कोण?

गेल्या काही दिवसांमध्ये पक्ष बदलणाऱ्यांवर 25, 50 ओके असे आरोप करण्याची नवीनच फॅशन आली आहे. ज्यांना कायमच बाजारामध्ये विकण्याची सवय झाली आहे, त्यांच्याकडून असे आरोप होणे स्वाभाविक आहे. करंजकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण बोलत होते, त्यांना पत्रकार परिषदेत शेजारून मार्गदर्शन करणारा बोलवता धनी कोण याचाही खुलासा केला तर बरे होईल असा चिमटा बोरस्ते यांनी घेतला.

बातम्या आणखी आहेत...