आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik | Shiv Jayanti 2022 | Marathi News | Changes In Traffic Route To Nashik Road Including Panchavati Area On The Occasion Of Shiv Jayanti; Vehicles Banned On This Route Till 12 At Night

अधिसूचना:शिवजयंतीनिमित्त पंचवटी परिसरासह नाशिकरोडला वाहतूक मार्गात बदल; रात्री 12 पर्यंत 'या' मार्गावर वाहनांना बंदी

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंद

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त पंचवटी आणि नाशिकराेडला बिटको परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँण्ड आणि नाशिकराेड येथील बिटको चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने हा बदल करण्यात आला.

या दिवशी वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये याकरिता वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. १९) दुपारी १२ ते रात्री १२ या कालावधीत या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. पाेलिसांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. शिवजयंती साेहळ्यासाठी शहर सज्ज झाले असून पताकांमुळे शहरात भगवेमय वातावरण तयार झाले आहे.

पंचवटीतील हे मार्ग वाहतुकीस बंद

वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी अधिसूचना काढली आहे. दिंडोरी नाक्याकडून पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँण्ड, रविवार कारंजाकडे येणारी व मखमलाबादनाक्याकडून मालेगाव स्टँण्डकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

नाशिकराेडमधील हे मार्ग वाहतुकीस बंद

नाशिकराेड येथील बिटको चौक व सिन्नर फाटा, रेल्वे स्टेशन येथून छत्रपती शिवाजी चौकाकडे उड्डाणपुलाच्या खालून येणारी व जाणारी वाहतूक छत्रपती शिवाजी चौक जेलरोड येथे बिटको चौकाकडून जेलरोडमार्गे नांदूरनाका व नांदूरनाक्याकडून बिटको चौकाकडे येणारी व जाणारी वाहतूक प्रवेश बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग असा | सिन्नर फाटा येथून पुलाखालून नाशिकरोड स्टेशनकडे जाणारी वाहतूक उड्डाणापुलावरून दत्तमंदिर चौक व तेथून दत्तमंदिर रोडने सुराणा हाॅस्पिटल, सत्कार पाॅइंट, रिपोर्टे काॅर्नर येथून स्टेशन व तेथून सुभाषरोडमार्गे परत याच मार्गाने दत्तमंदिर सिग्नल व पुढे जातील. नाशिककडून पुण्याकडे जाणारी वाहतूक दत्तमंदिर सिग्नल येथून वीर सावरकर पुलावरून सिन्नर फाट्याकडे जाईल. नाशिकराेड बसस्थानकात जा-ये करणाऱ्या बस वरील मार्गाने जातील. सीबीएसकडे येणाऱ्या बस नाशिकरोड कोर्टासमोरून आर्टिलरी रोडमार्गे जयभवानी चौकातून उजवीकडे वळून उपनगर सिग्नलमार्गे जातील. बिटको चौकाकडून जेलरोडमार्गे नांदूरनाक्याकडे जाणारी वाहतूक इंगळेनगर येथून कॅनाॅल रोडने जाईल.

पर्यायी मार्ग असा | दिंडोरी नाक्याकडून पंचवटी कारंजामार्गे मालेगाव स्टँण्ड, रविवार कारंजा मार्गे जाणारी व येणारी वाहतूक दिंडोरीनाका, मखमलाबादनाका, बायजाबाई छावणी, अशोकस्तंभ या मार्गाचा वापर करावा. अशोकस्तंभाकडून रविवार कारंजामार्गे पंचवटी कारंजाकडे जाणारी वाहतूक अशोकस्तंभ, सिद्धेश्वर मंदिर, बायजाबाई छावणी, रामवाडी, मखमलाबादनाका, पेठनाका सिग्नल, दिंडोरीनाकामार्गे इतरत्र जातील. दिंडोरीनाका पंचवटी डेपो येथून सुटणाऱ्या सर्व बसेस वरील मार्गाचा वापर करतील. मखमलाबादनाका सिग्नल येथून मालेगाव स्टँण्डकडे जाणारी वाहतूक चिंचबनमार्गे इतत्र जातील.

बातम्या आणखी आहेत...