आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळासाहेबांची शिवसेना अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील तब्बल 11 माजी नगरसेवकांना गळाला लावून जाेरदार धक्का दिल्यानंतर त्यास प्रतिउत्तर देण्याची रणनिती ठरवण्यासाठी आज नाशिक येथील शिवसेना भवनात दुपारी स्थानिक नेत्यांची किंबहुना काेअर कमिटीच्या सदस्यांची महत्वाची बैठक हाेणार आहे.
या बैठकीत, अन्य पक्षातील नाराज नेत्यांना गळाला लावण्याबाबत चर्चा हाेणार असून शिंदे गटाला कशापद्धतीने उत्तर द्यायचे याबाबत खलबते हाेणार आहेत. दरम्यान, स्थानिकांमधून माजी आमदार वसंत गिते यांना संपर्कप्रमुख करायचे की मुंबईतून परंपरेनुसार नवीन नेता आयात हाेणार याकडे लक्ष लागले आहे.
महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कथित मनमानीला लक्ष्य करीत माजी विराेधी पक्षनेता अजय बाेरस्ते यांच्या नेतृत्वाखाली 11 माजी नगरसेवकांनी शिंदे गटाची वाढ धरली. त्यानंतर उद्धव सेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चाैधरी यांनीही शिंदे गटात उडी घेतल्यानंतर नाशिकमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांना जबर धक्का बसला. या धक्क्यातून सावरत उद्धव सेनेने आता बंडखाेरांच्या प्रभागात मेळावे घेवून आघाडी उघडली आहे.
या माेहीमेचा भाग म्हणून आतापर्यंत दाेन मेळावे झाले आहे. त्यास उत्सपुर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करीत आक्रमक रणनिती ठरवण्यासाठी उद्धव सेनेने रणनिती ठरवण्याकरीता आज महत्वाची बैठक बाेलवली आहे.
गद्दारांना घरातून बाहेर पडणेही मुश्कील होईल- घाेलप
माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांचे प्रभाव क्षेत्र असलेल्या पाथर्डी भागात उद्धव सेनेने मेळावा घेतला. त्यात, शिवसेनेशी गद्दारी करणारा मग तो कुणी असो त्याला कदापि माफ केले जाणार नाही.त्याला घरातून निघणे मुश्किल करू,असे प्रतिपादन उपनेते तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर उपनेते सुनील बागूल,माजी आमदार वसंत गिते,सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर,माजी नगरसेवक केशव पोरजे,देवानंद बिरारी,सुभाष गायधनी,नाना पाटील,युवासेना उपजिल्हाप्रमुख बालम शिरसाठ, मंदाताई दातीर बाळा दराडे आदी होते. शिवसेनेच्या जीवावर जे मोठे झाले त्यांनी पक्षाशी गद्दारी करावी याचे आश्चर्य वाटते.खाल्ल्या मिठास जे जागत नाही ते दुसऱ्यांचे काय भले करणार असा सवाल उपनेते सुनील बागुल यांनी केला
संपर्कप्रमुख स्थानिक की मुंबईचा ?
चाैधरी यांनी शिंदे गटात उडी घेतल्यानंतर आता नवीन संपर्कप्रमुख काेण हाेणार याबाबत उत्सुकता शिगेला गेली आहे. स्थानिकांमधून संपर्कप्रमुख द्यावा असा सुर असून जेणेकरून उद्धव सेनेत काेणाच्या एकाची मक्तेदारी राहणार आहे. संपर्कप्रमुखांमध्ये वसंत गिते यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र स्थानिकपातळीवर विश्वास दाखवतात की मुंबईतून पुन्हा नवीन नेता आयात हाेताे हे बघणे महत्वाचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.