आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक मनपा आयुक्तांनी थकबाकीची रक्कम भरण्यासाठी तीन महिन्यांचा एक टप्पा याप्रमाणे मुभा दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांकडून थकबाकीपाेटी गाळे सील करण्याची माेहिम सुरू ठेवण्यात आली आहे. यामुळे गाळेधारकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आज (दि.6) शहरातील सुमारे 2200 गाळेधारकांनी सकाळी 10 ते 12 या वेळेत दुकाने बंद ठेवून प्रशासनाचा निषेध केला.
अर्थसंकल्पीय अधिवेनशाच्या पहिल्याच दिवशी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अन्यायकारक भाडेवाढ कमी करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही तात्काळ आयुक्तांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून धाेरण ठरविण्याबाबतची सूचना केली. दुसऱ्याच दिवशी आयुक्तांनी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तीन तीन महिन्यांचा हप्ता करून थकीत रक्कम भरण्यास सांगितले.
व्यावसायिक सहभागी
या सूचनांनतरही मनपाच्या विविध कर वसुली पथकाकडून मार्चच्या शेवटचा आठवडा असल्याचे कारण देत थकबाकीदारांचे गाळे सील करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. या विराेधात गाळेधारकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्याने त्यांनी साेमवारी दाेन तास दुकाने बंद ठेवून प्रशासनाचा निषेध नाेंदवला. या आंदाेलनात शिवाजीराेड, मेनराेड, पंचवटी, भद्रकाली, नाशिकराेड, सातपूर खाेका मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई, इंदिरा गांधी मार्केट सातपूर काॅलनी, शिवाजीनगर मार्केट, आनंदवली मार्केट, महात्मानगर शाॅपींग सेंटर अशा विविध भागातील व्यावसायिक सहभागी झाले हाेते.
उच्च न्यायालयाला करणार विनंती
गाळेधारक संघटनांनी अन्यायकारक भाडेवाढीबाबत न्यायालयात दाद मागितली हाेती. मात्र त्यांच्या विराेधात निकाल गेल्यामुळे आता उच्च न्यायालयात विनंती करण्यात येणार आहे.
काय आहेत मागण्या?
नवीन भाडेवाढ 2017 पासून रेडीरेकनर नुसार 2 ते 3 टक्क्यानुसार वाढ करावी. गाळे भाड्यावर जीएसटी आकारावी व इतर सर्व मालमत्ता करात कायद्याप्रमाणे आकारणी करावी. इमातीनुसार आरसीसी, लाेडबेरींग, व सिमेंट पत्रे असलेल्यांचे मुल्यांकन करून आकारणी करावी, अशा गाळेधारकांच्या मागण्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.