आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली येथील भाविक तरुण गर्ग आणि ज्योती गर्ग परिवाराने श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टकडून सूरू असलेल्या श्री भगवती मंदिर सभामंडप जीर्णोद्धार प्रकल्पासाठी ११ लाख रुपयांचे दान देत अनोखे दातृत्व दाखवले आहे. रविवार १४ मे रोजी तरूण गर्ग यांनी सहकुटुंब श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे भेट देवून श्री भगवतीची आरती करून ११ लाख रूपयांच्या रकमेचा धनादेश ट्रस्टचे विश्वस्त अॅड. दिपक पाटोदकर यांकडे सुपूर्द केला.
शिर्डीच्या श्री साईबाबांचे भक्त असलेले गर्ग कुटुंबीय हे काही दिवसांपूर्वी श्री भगवती दर्शनासाठी आले असतां ट्रस्टचे विश्वस्त अॅड. दिपक पाटोदकर यांनी त्यांना विश्वस्त संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या विकास कार्य व भाविकांच्या सेवा सुविधांची प्राथमिक माहिती दिली. याा प्रसंगी त्यांनी श्री भगवती सेवेत काहीतरी योगदान देणे बाबत ईच्छा व्यक्त केली असता त्यांच्याशी ट्रस्टच्या वतीने आवश्यक तो समन्वय करण्यात आला.
रविवारी प्रत्यक्षात धनादेश सुपुर्द केल्यानंतर गर्ग यांनी भविष्याकाळात श्री सेवेत तांत्रिक व यांत्रिकीकरण आधारित विशेष यंत्र सामग्री उपलब्ध करून देण्याची ईच्छा दर्शविली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अॅड. दिपक पाटोदकर, अॅड. महेंद्र जानोरकर, अश्विन शेटे, कमलाकर गोडसे, बाळा कोते यासह विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर आदी उपस्थित होते.
अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर जिर्णाेद्धार
लाखाें भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या महाराष्ट्रातील शक्तिपिठांपैकी एक असलेल्या आद्यस्वयंभू शक्तिपिठ सप्तशृंगगडावरील भगवती देवी मंदिराच्या सभामंडपाच्या जिर्णाेद्धाराचे काम उद्या, अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सुरू झाले आहे. या अंतर्गत, सभामंडपाचा विस्तार, सुशाेभीकरण, चांदीचे नक्षीकाम केले जाणार असून सात काेटी रूपयांचा खर्च अपेक्षीत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.