आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक-सिन्नर महामार्गावर आज दुपारी राज्य परिवहन महामंडळाची बस आणि दुचाकींचा अपघात झाला आहे. त्यात दोन दुचाकीस्वारांसह आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. शिंदे टोल नाक्याजवळ हा विचित्र अपघात झाला आहे. अपघातानंतर बसने अचानक पेट घेतला. या प्रकारामुळे प्रवाशांनी धावपळ करत मिळेल त्या मार्गाने पेटत्या बसमधून बाहरे पडले, या घटनेत काही प्रवाशी किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे पळसे गावाजवळ हा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने बसने दुचाकीस्वारांना चिरडले. या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने प्रवाशांनी धावत्या बसमधून उडी मारली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
बचावकार्य सुरू
सध्या बचावकार्य सुरू असून या अपघातात 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमी प्रवाशांची नावे
हर्षदा मंगेस पोंदे, संगमनेर रुपाली सचिन दिवटे, अकोले समृद्धी सचिन दिवटे सईदा इनामदार, संगमनेर मुस्तफा शेख, संगमनेर नसमा जहाँगिरदार, संगमनेर औवेस अहमद, धारावी मुंबई सिताराम देवराम कुरणे, सिकर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.