आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषणाचे हत्यार:दाेषी ठरविण्यात आलेल्या मुख्याध्यापकांच्या वेतनाचा मार्ग पुन्हा माेकळा; तक्रारदाराकडून आंदोलनाचा इशारा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाेकडे येथील सत्यवती कौर विद्यालयातील दाेषी ठरविण्यात आलेल्या मुख्याध्यापकांच्या वेतनाचा मार्ग पुन्हा माेकळा झाला आहे. दरम्यान याविरोधात तक्रारदाराकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

टाेकडे येथील सत्यवती कौर विद्यालयातील मुख्याध्यापक सुनील धोंडू फरस यांनी लहान कुटूंब कायदा शासन नियमाचे भंग केल्यामुळे त्यांचे वेतन थांबवून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी २७ फेब्रुवारी २०२२ राेजी काढले हाेते.

हे पत्र वेतन अधीक्षक पथकाकडे १० मार्च २०२३ ला देण्यातआले. मात्र, त्यानंतर पुन्हा ३१ मार्च २०२३ राेजी याआदेशाला स्थगिती देण्यातआल्याने दाेषी ठरविण्यातआलेल्या मुख्याध्यापकांच्या वेतनाचा मार्ग पुन्हा माेकळा झाला आहे. दरम्यान या विराेधात मुंबईच्या आझाद मैदानावर उपाेषण करण्याचा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.

मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील सत्यवती कौर विद्यालयातील मुख्याध्यापक सुनील धोंडू फरस यांना लहान कुटूंब कायदा २००५ ची अंमलबजावणी झाल्यानंतर दिनांक १ जुलै २००६ राेजी शिक्षण सेवक म्हणून मान्यता मिळाली आहे. मात्र मुख्याध्यापकांनी लहान कुटूंब कायदा शासन नियमाचा भंग करीत तिसरे अपत्य जन्माला घातल्याने नियमानुसार त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विठाेबा द्यानद्यान यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह वरिष्ठ कार्यालयाकडे केली हाेती.

यानंतर वेळाेवेळी स्मरणपत्र देऊन या गंभीर विषयाकडे लक्षही वेधले. त्यानंतर संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केल्यावर शिक्षण उपसंचालकांच्या सुनावणी इतिवृत्तातील आदेशान्वये नियुक्त प्राधिकारी म्हणून संस्थाचालक यांना बडतर्फ करण्याबाबत वेळोवेळी कळविले. परंतु मुख्याध्यापक हे संस्थेच्या अध्यक्षांचे जावई असल्याने त्यांच्यावर अद्याप बडतर्फीची कारवाई झालेली नाही.

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी चुकीची ठरलेली मान्यता रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणेआवश्यक हाेते. मात्र त्यांनी वेतन अधीक्षकांना पत्र देऊन वेतन थांबविण्याचेआदेश काढले हाेते. प्रत्यक्षात मात्र वेतन अधीक्षकांकडे ते देण्यातआले नव्हते. द्यानद्यान यांच्या चुप बैठाेआंदाेलनानंतर तेआदेश वेतन पथकास १० मार्च २०२३ ला देण्यातआले. मात्र ३१ मार्चला पुन्हा त्याआदेशास स्थगिती दिली. शिक्षणाधिकाऱ्यांच्या या अजब कारभाराची सध्या चांगलीच चर्चा रंगलीआहे.

मुंबईत करणार उपाेषण

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अर्थपुर्ण दबावाखाली स्थगितीचेआदेश दिलेलेआहेत. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव यांना मेल द्वारे कळविण्यातआले असून लवकरच मुंबईतीलआझाद मैदानावर उपाेषण करणार आहे. - विठाेबा द्यानद्यान, तक्रारदार

​​​​​​​मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव देणार

मुख्याध्यापकांनी शासकीय नियमाचा भंग केल्याने त्यांची मान्यता काढून घेण्याचा व त्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणारआहे. धर्मदायआयुक्तांनाही याबाबत कळविण्यातआले. - प्रविण पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक.