आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक ड्रममधून मद्याची चोरटी वाहतूक:1920 मद्याच्या बाटल्या जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागची वणीत कारवाई

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मद्य तस्कर अवैध मद्य वाहतूक करण्यासाठी काय काय शक्ल लढवतील याचा नेम नाही.अशाच प्रकारे पालघर येथील मद्य तस्कराने टेम्पो मध्ये 12 प्लास्टिकच्या ड्रम मध्ये साबण बनविण्याच्या जेलीच्या पाकिटातून दादरा व नगर हवेली निर्मीत तब्बल 1920 मद्याच्या बाटल्या वाहतूक करतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळून आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कसबे वणी गावात एका हाॅटेलच्या समोर ही कारवाई केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विभागाच्या कळवण विभागाच्या पथकाला माहिती मिळाली. एका टेम्पो मधून मद्याची चोरटी वाहतूक होत असल्याचे समजले. पथकाने वणी दिंडोरीरोडवर सारळा रचला. संशयित टेम्पो एमएच 48 एवाय 2935 ला थांबवण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता टेम्पो मध्ये 12 प्लास्टिकचे सीलबंद ड्रम आढळून आले. वाहन चालक संशयित दिनानाथा सीताराम पाल रा. पालघर यास विचारणा केली असता त्याने ड्रममध्ये साबण निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या एसएलईएस जेलची कागदपत्र दाखवले. सुरवातीला ड्रम मध्ये खरोखर जेल असावी असे पथकाच्या अधिकाऱ्यांना वाटले होते. एक ड्रम खोलण्यास सांगीतला असतात चालकाने नकार दिला. पथकाला संशय आला. ड्रमचे सील तोडून पाहिले असता जेलीच्या पाऊच मध्ये मद्याच्या बाटल्या असल्याचे आढळून आले. 12 ड्रम मधून दादरा व नगर हवेली निर्मीत विदेशी मद्याचे 1920 बाटल्या पथकाने जप्त केल्या. उपविभागीय अधिकारी अर्जून ओहळ, अधिक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सुनील सहस्रबुद्धे, महेंद्र सोनार, दिपक आव्हाड, एम.सी. सातपुते, व्ही.टी. कुवर, एस.डी. पोरजे, पी.एम. वाईकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पुरवठादार आणि खरेदीदारावर कारवाई

अधिक्षक शशीकांत गर्जे म्हणाले की, अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या चालकाकडून वाहन मालक, मद्यसाठटा पुरवठादार आणि मद्य खरेदी करणारे ज्ञान अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाच्या चौकशीत संशयितांचे नावे निष्पन्न झाल्यानंतर कारवाई केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...