आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीचा मामला:नाशिकमध्ये चोरीच्या 10 दुचाकी जप्त; सापळा रचून कारवाई, खेड्यापाड्यात कागदपत्राविना विकल्या

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये चोरट्यांकडून चोरीच्या दहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

विशेष म्हणजे चोरट्यांनी कागदपत्रे नंतर देतो म्हणत दुचाकी खेड्यापाड्यातल्या गावकऱ्यांना विकल्याचे समजते. त्यामुळे त्यांना नाहक भुर्दंड बसला आहे.

देवळाली कॅम्प येथील पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने २ मे २०२३ रोजी संशयित आरोपींकडून नऊ मोटरसायकल आणि तीन रेसर सायकल असा एक लाख 74 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यातील संशयित आरोपींची सकल चौकशी केली असता, अजून एक संशयित आरोपी निष्पन्न झाला. त्याच्याकडून सुमारे तीन लाख सत्तावीस हजार किमतीच्या दहा मोटरसायकली देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतल्या.

चोरीतील संशयित आरोपींची माहिती घेतली असता तुषार उर्फ वाळ्या, संपत गायकवाड (वय वर्ष 19 राहणार, भेंडाळी, ता. निफाड) याचा शोध घेत होते. त्यादरम्यान पोलिस हवालदार श्याम कोटमे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सायखेडा भेंडाळी रोडवरील वरील एका लॉन्सवर संशयित येणार असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. त्या ठिकाणी संशयित आला असता, त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने वाहन चोरीतील संशयित आरोपी किरण राजू गांगुर्डे (रा. चुंचाळे) याच्याकडून मागील दोन वर्षात वेळोवेळी चोरीच्या मोटरसायकल घेऊन त्या भेंडाळी , चापडगाव, निफाड, दिंडोरी या परिसरात विकल्याचे समोर आले.

संशयित आरोपी तुषार उर्फ वाळ्या संपत गायकवाड यांनी विकलेल्या एकूण दहा मोटरसायकली वरील तारखेला यापूर्वी नमूद आरोपीकडून नऊ मोटरसायकल व तीन रेसर सायकल असा एकूण एक लाख 74 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणात आतापर्यंत 19 मोटरसायकली तीन रेसर सायकली असा ऐकून पाच लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने हस्तगत केला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी किरण राजू गांगुर्डे त्याचा साथीदार गौरव गणेश लहामटे (वय वर्षे 24, रा. टाकेद बुद्रुक, ता. इगतपुरी) तसेच एक विधीसंघर्षित बालकाकडून चोरीच्या नऊ दुचाकी आणि तीन रेसर सायकली हस्तगत करण्यात आल्या होत्या.

या तिघांनी चोरी केलेल्या अजून दहा दुचाकी संशयित तुषार उर्फ वाळ्या संपत गायकवाड याला विकल्या. त्याने सदर दुचाकी नाशिक जिल्ह्यातील विविध गावखेड्यांमध्ये गाडीचे कागदपत्र नंतर देतो असे म्हणत शिल्लक किमतीना विवीध शेतकऱ्याना विकल्याचे निष्पन्न झाले आहेत. या गुन्हात संशयित गौरव गणेश लहामटे यास यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.