आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसंस्कृतीच्या एक मुठ्ठी अनाजमधून 1000 किलाे धान्य संकलीत:अनाथ मुलांसाठी चॅरीटी शाेमधुन 50 हजार रुपयांची राेख मदत

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनाथ मुलांसाठी धान्य पुरविण्यासाठी सुसंस्कृति फाउंडेशनच्या चॅरिटी शोमध्ये नाशिककरांचे औदार्य पुन्हा एकदा पाहायला मिळाले. हे फाऊंडेशन ‘एक मुठ्ठी अनाज’ योजनेअंतर्गत समाजातून धान्य, तेल, देणगी संकलीत करून समाजातील उपेक्षित अनाथ मुलांची भूक भागविण्याचा आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. मंगळवारी रात्री याचकरीता प.सा.नाट्यगृहात आयाेजित चॅरीटी शाेमधुन नाशिककरांनी फाउंडेशनच्या आवाहनाला साथ देत तब्बल 1 हजार किलाे धान्य आणि 50 हजार रुपये राेख देणगी स्वरूपात दिले.

सुसंस्कृति फाउंडेशनचे संस्थापक धनंजय जैन यांनी सांगितले की, फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक आचार्य यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एक मुठ्ठी अनाज योजनेअंतर्गत आतापर्यत 10 हजार क्विंटलपेक्षा अधिक धान्य अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या सामाजिक संस्थांना पुरविण्यात आले. यामध्ये एचआयव्हीग्रस्त मुलांचा सांभाळ करणारी बीडजवळील इन्फंट इंडिया, आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि ऊसतोड मजूरांच्या मुलांचा सांभाळ करणारी शांतिवन आणि चाकणजवळ अनाथ मुलांचा सांभाळ करणारी स्नेहवन सामिल आहे. याव्यतिरिक्त फाउंडेशनतर्फे लाॅकडाऊनच्या काळात काही गरजू लोकांना तसेच गेल्या वर्षी चिपळूणला आलेल्या महापुरातील गरजूंना मदत केली गेली आहे.

गाण्यांची मैफल

नि:शुल्क प्रवेश असलेल्या या चॅरीटी शाेमध्ये माेहम्मद रफी आणि शम्मी कपुर यांची सदाबहार गिते सादर झाली. गायक प्रमाेद देव, सहगायिका श्रेयसी राय, मेघा मुसळे यांनी ही गाणी गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले हाेते. या प.सा.नाट्यगृहाच्या प्रांगणातच धान्य संकलनासाठी एक गाडीही उभी करण्यात आली हाेती. कार्यक्रम संपेपर्यंत येथे 1 हजार किलाे धान्य संकलीत झाल्याचे संंस्थेचे अध्यक्ष अशाेक आचार्य, जैन इंटरनॅशनलचे चेअरमन अनिल नहार, अफलातून ग्रृपचे एडमिन हरीश ठक्कर या कार्यक्रमास उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...