आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअ. भा. मराठी पत्रकार परिषद, (मुंबई) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया कला, क्रीडा, कृषी, धार्मिक, शैक्षणिक, वृत्तपत्र विक्रेते, उद्योजक, सामाजिक संस्था अशा ३८ जणांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष सुधाकर गोडसे यांनी सांगितले. ‘दिव्य मराठी’चे छायाचित्रकार अशोक गवळी यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
देवळाली कॅम्प येथील डॉ. गुजर सुभाष हायस्कूलच्या सभागृहात गुरुवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव घोलप तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज आहिरे, कॅन्टोन्मेंट सदस्य प्रीतम आढाव, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी रतन चावला यासह विविध दैनिकांचे संपादक व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पुरस्कारार्थींमध्ये प्रिंट मीडियासाठी उमेश परिपूर्ण, अशोक निसाळ, दिलीप सूर्यवंशी, दत्ता जाधव, विलास भालेराव, महेश गायकवाड, प्रशांत निरंतर, श्रीधर गायधनी, जिजा दवंडे, राजेंद्र सूर्यवंशी, नीलेश अलई, सुशील भागवत, गुलाब ताकाटे, करण बिडवे, चंद्रशेखर गोसावी, इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी कल्पेश लचके, जितेंद्र नरवडे, वृत्तपत्र विक्रेते नीलेश हासे ( भगूर ) देवळालीतील सर्पमित्र विक्रम कडाळे व नाशिकरोडच्या प्रा. संगीता पवार (साहस), लाखलगाव येथील प्रशांत दाते व शिंदे येथील सुनील भिसे (कृषी), कैलास भोर व संजय कल्याणी (समाजकार्य) शिवम तागड (क्रीडा), पळसे येथील अमोल गायधनी, संजय पेखळे, तन्वी लखवानी (शैक्षणिक), शिवा महाराज आडके (धार्मिक), बबनराव कांगणे ( उद्योजक ), सुमित्रा पाटोळे (सांस्कृतिक) यांच्यासह ओढा येथील जगदंबा माता ट्रस्ट, देवळालीतील शंकर एज्युकेशन सोसायटी, देवळाली जनकल्याणी फाउंडेशन आदर्श सैनिक फाउंडेशन, पंचवटी येथील आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ आदींचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला जाणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, अध्यक्ष सुधाकर गोडसे, कार्याध्यक्ष सुनील पवार, सरचिटणीस अरुण बिडवे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.