आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजनतेला खाेटी आश्वासने देऊन सत्ता मिळवणाऱ्या भाजपच्या माेदी सरकारने अच्छे दिन ऐवजी लाेकांना महागाईच्या खाईत लाेटले. अन्न धान्न्यासह पेट्राेल, डिझेल व गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ केली. त्यामुळे सामान्य माणसांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. सरकारच्या या धाेरणाचा निषेध करण्यासाठी माकपातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शेने करण्यात आली.
केंद्राने महागाई कमी करून जनतेला दिलासा देण्याऐवजी 2022 मध्ये दाेन वेळा गॅसच्या किमतीत वाढ केली. त्यानंतर 2023 मध्येही पुन्हा गॅसच्या दरात वाढ केल्याने सर्वसामान्य कुटुंब आर्थिक झळीमुळे हाेरपळून निघत आहे. अच्छे दिन चे स्वप्न दाखवून जनतेचे महागाईने कंबरडे माेडले आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 1500 ते 1700 रूपये प्रति क्विंटल खर्च येत असताना शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून 300 ते 400 रूपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकरी चिंतातुर झालेला आहे. प्रमुख दुध विक्री करणाऱ्या कंपन्यांनी दुधाचा दर 2 ते 5 रूपये प्रति लिटर वाढवला आहे. एका वर्षात 200 ते 250 रूपयांचा बाेजा प्रत्येक कुटुंबाच्या बजेटवर पडला आहे. सामान्य जनतेला केंद्र सरकारची महाशक्ती सातत्याने महागाईचे तडाखे देत आहे. महागाईने नऊ वर्षात देशात उच्चांक गाठला आहे. सरकारने केलेली गॅसची दरवाढ व महागाई कमी करून सामान्य जनतेची या जगण्या- मरण्याच्या काेंडीतून सुटका करावी यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हे आंदाेलन करण्यात आले. माकपचे नेते डाॅ. डी.एल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना अॅड. वसुधा कराड, काॅ. सीताराम ठाेंबरे, काॅ. तानाजी जायभावे, संताेष काकडे, सिंधु शार्दुल भिवाजी भावले, तुकाराम साेनजे, सतीश खैरनार, माेहन जाधव आदींच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.