आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik Threw Petrol On Her Boyfriend Death | Valentine Day |love Affair, The Lover Burns The Lover Alive With The Help Of The Family; Young Man Dies During Treatment | Marathi News

अखेरचा श्वास:प्रेमप्रकरणातून प्रेयसीने कुटुंबियांच्या मदतीने प्रियकराला जिवंत जाळले; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेमदिनाला गालबोट, प्रेयसीने जाळलेल्या युवकाचा व्हेलेंटाईन दिनी मृत्यू

लग्न मोडण्याच्या कारणावरून मुलगी व तिच्या नातेवाइकांनी युवकाला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रकार शुक्रवारी नाशिकच्या लोहोणेरमध्ये (ता. देवळा) घडला आहे. या घटनेत युवक 55% भाजला गेला होता. त्याच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. व्हेलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला अशी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लग्न मोडण्याच्या कारणावरून मुलगी आणि तिच्या नातेवाइकांनी मिळून युवकाला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रकार शुक्रवारी घडला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहोणेर येथील गोरख काशीनाथ बच्छाव (31) हा युवक 2 ते 3 वर्षांपासून रावळगाव येथील युवतीच्या संपर्कात होता. यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर संबंधित युवतीच्या कुटुंबीयांनी आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी तिचा विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही कारणास्तव हा विवाह मोडला.

त्यामुळे हा विवाह गोरख बच्छाव यानेच मोडला असावा, या संशयातून मुलीच्या नातेवाइकांनी गोरखला फोन करून तू लोहोणेरला थांब आम्ही पंचायतजवळ आलो, असे सांगून त्याला बोलावून घेत त्यास शिवीगाळ केली. यानंतर युवतीच्या आई, वडील व भाऊ यांनी गोरखच्या डोक्यात लोखंडी रोड मारून जखमी केले, तर युवतीने त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेत गोरख 55% भाजला गेला होता. त्याच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

पाच संशयित ताब्यात पोलिसांनी संशयित कल्याणी गोकुळ सोनवणे (23), गोकुळ तोगल सोनवणे (57), निर्मला सोनवणे (52), हेमंत सोनवणे (30) व प्रसाद सोनवणे (18, सर्व राहणार) रावळगाव यांना ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...