आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामाेजी फिल्मसिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा कायापालट:एमटीडीसी-पालिका येणार एकत्र ; डिपीआरसाठी मागवले स्वारस्य अभिदेकार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक वर्षापासून पालिकेसाठी अर्थिकदृष्ट्या पांढरा हत्ती ठरलेल्या फाळके स्मारकाच्या पुर्नविकासासाठी आता, आयुक्त डाॅ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दंड थाेपाटले असून त्यांनी हैद्राबादच्या रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पर्यटन विकास महामंडळाची मदत घेतली जाणार असून पालिकेने तुर्तास सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी शनिवारी स्वारस्य देकार मागवले.

एकेकाळी नाशिक शहरातील अत्यंत महत्वाचा प्रकल्प म्हणून फाळके स्मारकाची किर्ती संपुर्ण राज्यभरात हाेती. मुंबई, पुण्यातून नाशिकला येणाऱ्या पर्यटकांकडून पांडवलेणी व फाळके स्मारकाला आर्वजून भेट दिली जात हाेती. 1999 मध्ये पाथर्डी शिवारातील त्रिरश्मी लेण्यांच्या पायथ्याशी 29 एकर जागेत उभारलेला हा प्रकल्प कालांतराने उत्पन्नाची ठाेस याेजना नसल्यामुळे अडचणीत आला.

आतापर्यंत जवळपास 11 कोटी रुपयांचा खर्च झाला असून त्यानंतरही प्रकल्पामागील दुरावस्थेचे ग्रहण कायम आहे. मनसेची सत्ता असताना राज ठाकरे यांनी खासगीकरणातून फाळके स्मारकाच्या कायापालटाचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही. त्यानंतर कैलास जाधव हे आयुक्त असताना त्यांनी एका सिनेसृष्टीतील ख्यातनाम व्यक्तीमार्फत फाळके स्मारकाचा विकास करण्याचा प्रयत्न केला मात्र हा व्यवहार संबधित व्यक्तीच्या फायद्याचा तर पालिकेच्यादृष्टीने आतबट्ट्याचा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यावर फुली मारली गेली.

त्यानंतर तत्कालीण आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी फाळके स्मारकाची स्वत: डागडूजी करीत उदय्ान सर्वांसाठी खुले केले हाेते. त्यांचाही हैद्राबाद येथील रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर विकास करण्याचा प्रयत्न असतानाच त्यांचीही बदली झाली. दरम्यान, आता डाॅ पुलकुंडवार यांनी हा प्रकल्प मनावर घेत अंदाजपत्रकात समावेश केला आहे. शुक्रवारी अंदाजपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर बांधकाम विभागाने प्रकल्प सल्लागार ( प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट) नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. 25 दिवसात स्वारस्य देकार मागविले असून संबधित सल्लागार संस्थाच याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणार आहे.

निधीचा भार पर्यटन विकास महामंडळावर

महापालिकेची अर्थिक परिस्थीती नाजुक असल्याचे कारण देत या प्रकल्पासाठी पर्यटन विकास महामंडळाकडे हात पसरवला गेला आहे. सुमारे 50 काेटी रूपयांचा निधी मिळण्याबाबतचे पत्र शुक्रवारी (०३) एमटीडीसीकडे पाठविण्यात आले आहे.एमटीडीसीचे 50 कोटी आणि पालिकेचा स्वनिधी अशा सयुंक्तविद्यमाने या स्मारकाचा चित्रनगरी म्हणून विकास केला जाणार आहे. फिल्मसिटीच्या धर्तीवर सुविधा पुरविणे,थिम पार्क,वॉटर पार्कमधील उपकरणे, अॅम्युझमेंट पार्क, अॅडव्हेंचर पार्क आदी सुविधा केल्या जाणार आहेत.

रामाेजी फिल्मसिटीच्या धर्तीवर पुर्नविकास

फाळके स्मारकाचा पुर्नविकास करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी अंदाजपत्रकातील याेजनेप्रमाणे हैद्राबादच्या रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर विकासासाठी सल्लागार नियुक्ती केली जाईल. त्यासाठी इच्छुकांकडून स्वारस्य देकार ( एक्सप्रेस ऑफ इंट्रेस्ट) मागविण्यात आले आहे.

शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, मनपा

बातम्या आणखी आहेत...