आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचुंचाळे येथील पांजरापाेळची जागा उद्याेगांसाठी देण्याचा मुद्दा पेटल्यावर उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी गायींसाठी जागा राखीव ठेऊन उर्वरित जागा उद्याेगांसाठी घ्या. यासाठी सर्वेक्षणाचे आदेश दिल्यानंतर गेल्या महिन्याच्या शेवटच्या अाठवड्यात सर्वेक्षण सुरू झाले. या ठिकाणी तब्बल अडीच लाख झाडे असून वन्यप्राण्यांचा अधिवासही असल्याने ही जागा उद्याेगांसाठी देण्यास पांजरापाेळने स्पष्ट नकार दिला हाेता.
आता प्रत्यक्ष केलेल्या सर्वेक्षणातही येथे अडीच लाख वृक्ष असून वन्यप्राणीही असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली. त्यामुळे आता या जागेसंदर्भात प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. तीन महिन्यांपासून रखडलेले चुंचाळे येथील पांजरापाेळचे सर्वेक्षण मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाले हाेते. १० मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश महसुल, वन, जलसंधारण, महापालिकेसह विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
यानंतर प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरूवात झाली आणि शनिवारी (दि. ६)हे सर्वेक्षण पूर्ण झाले अाहे. साेमवारी (दि. ८)या सर्व संबंधित विभागांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या अनुषंंगाने एकत्रित बैठक तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली हाेत असून पुढील दाेन दिवसांत एकत्रित अहवाल जिल्हाधिकारी गंगाधरण डी. यांना सादर केला जाणार आहे. वन आणि कृषी विभागाच्या जवळपास ५० कर्मचाऱ्यांनी पांजरापाेळच्या चुंचाळे येथील जागेवर किती वृक्ष, काेणत्या प्रजातींचे, वयाचेआहेत यासंदर्भात सर्वेक्षण केले आहे.
तर जलसंधारण विभागाने पाण्याचे साठवण तळे, नैसर्गिक पाणवठे यासंदर्भात माहीती संकलीत केल्याची माहीती सुत्रांनी दिली अाहे. याशिवाय काेणकाेणत्या प्रजातीचे पशु-पक्षी येथे अाढळतात, त्यांचा अधिवास अाहे का? याचीही पहाणी करून अहवाल तयार झाला अाहे. या सगळ्या विभागांचे अहवाल तहसिलदार यांना सादर केले जातील अाणि त्यानंतर एक एकत्रित अहवाल तयार करून ताे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार अाहे.
असे आहे जागेचे प्रकरण
अंबड अाैद्याेगिक वसाहतीलगत असलेली चुंचाळे शिवारातील पांजरापाेळची जमीन उद्याेगांसाठी राज्य शासनाने संपादीत करावी अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह औद्याेगिक संघटनांनी केली हाेती. शहराच्या विकासासाठी पांजरापाेळकडे असलेल्या गायीच्या तुलनेत अमाप जमीन असून ती आता उदयाेगांना मिळाली पाहीजे अशी भूमीकाही उद्याेजकांनी घेतली हाेती. दुसरीकडे येथील पांजरापाेळच्या ८०० एकरवरील जागेवर जवळपास अडीच लाख वृक्ष असून हे शहराचे फुफ्फुस नष्ट हाेऊ देणार नाही असा पवित्रा पर्यावरण प्रेमींनी घेतला हाेता. मात्र, आदेशानुसार स्थापन केलेल्या समीतीने हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.