आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्वारका परिसरात वाहतुकीचा बोजवारा:दोन ते अडीच किलोमीटर लागल्या वाहनाच्या रांगा; वाहतूक पोलिस मात्र गायब

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहराचे प्रवेशद्वार संघाच्या जाणाऱ्या द्वारका परिसरात दुपारी वाहतुकीचा बोजबारा उडाला. वाहतूक कोंडी निर्माण होऊन परिसरात दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत होते. विशेष म्हणजे वाहतूक कोंडी निर्माण झालेली असताना वाहतूक पोलिस गायब असल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात होता

लांबच लांब रांगा

मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्याबरोबरच द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा गाजावाजा करत महामार्गावर उड्डाणपूल साकारण्यात आला. मात्र, त्यानंतर हे द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा अद्यापही कायम आहे. शनिवारी दुपारी पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन-अडीच तास ही वाहतूक कोंडी कायम असल्याने वाहनधारकांना पादचार्‍यांना या ठिकाणाहून मार्गक्रमण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

वाहतूक पोलिस गायब

कोंडी निर्माण झाल्यानंतर वाहतूक पोलिस गायब होते. आगामी पावसाळा लक्षात घेता या परिसरातील वाहतूक कोंडी हा प्रश्न सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठोस नियोजन करत वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविला पाहिजे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

आढावा घेण्याची गरज

द्वारका परिसरात आठहून अधिक रस्ते येत असल्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र, वाहतूक कोंडी होत असल्याने अनेकदा छोट्या-मोठ्या अपघातात भर पडत असते. याबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता पोलिस आयुक्तांनी आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...