आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Nashik Update | Patients Will Benefit From Regular Training Changing Technology | Inauguration Of National Training Council For Surgeons

बदलत्या तंत्रज्ञानाच्या नियमित प्रशिक्षणाचा लाभ रुग्णांनाच होणार:शल्यविशारदांच्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे हे आता बदलत्या तंत्रज्ञानामुळे सुलभ होत आहे. रुग्णांसाठी पण अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया या तुलनेने कमी त्रासाच्या असतात. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया या क्षेत्रात निरंतर होणाऱ्या बदलांची माहिती ही शल्यविशारदांच्या कौशल्यात भर पडून त्याचा उपयोग रुग्णांनाच होईल असे उदगार चेन्नईच्या प्रसिद्ध जेम हॉस्पिटलचे मुख्य शल्यविशारद डॉ. पी. सेंथिलनाथन यांनी काढले.

असोसिएशन ऑफ मिनिमल एक्सेस सर्जन ऑफ इंडिया ही नियमितपणे प्रशिक्षण परिषदेचे आयोजन करत असते. अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे सत्र यावर्षी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे, हाॅटेल ग्रॅंड रिओ येथे सुरू झालेल्या या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डाॅ. सेंथिलनाथन हे मार्गदर्शन करत हाेते.

शिल्पा दयानंद उपस्थित

व्यासपीठावर या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेच्या संयोजन समितीचे प्रमुख डॉ. रमेश पाटील, सचिव डॉ. संदीप सबनीस अशोका मेडिकलचे डॉ. सुशील पारख, वरिष्ठ तज्ञ डॉ. रमेश डूमरे व डॉ. प्रमोद शिंदे तसेच नाशिक सर्जिकल सोसायटीच्या डॉ. शिल्पा दयानंद उपस्थित होत्या.

84 वे प्रक्षिषण

अशा प्रकारच्या प्रशिक्षणातून युवा तसेच अनुभवी डॉक्टरांना खूप लाभ होतो असे सांगून आयोजित करण्यात आलेले हे 84 वे प्रक्षिषण असल्याचे देखील डॉ. सेंथिलनाथन यांनी यावेळी स्पष्ट केले.

नामवंत तज्ञ नाशिकला

या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संयोजन समितीचे प्रमुख डॉ. रमेश पाटील म्हणाले की, या परिषदेला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. नवनवीन तंत्र शिकण्याकडे जो कल गेल्या काही वर्षात वाढला आहे त्यामध्ये अशा प्रकारच्या परिषदांची भूमिका महत्त्वाची असते‌. नाशिकमध्ये होत असलेल्या या परिषदेमुळे देशातील नामवंत तज्ञ नाशिकला आले.

यांचा गौरव

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. परिषदेच्या आयोजनामधील सक्रिय सहभागासाठी डॉ. संतोष रावलानी, डॉ. स्वप्नील पारख, डॉ. संदेश पवार, डॉ. सुरेश मालेगावकर, डॉ. डी व्ही जोशी, डॉ. प्रशांत मुथाल, डॉ. श्रद्धा सबनीस व डॉ. मनोज यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गुंजन मिश्रा यांनी तर आभार डॉ. संदीप सबनीस यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...