आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर रोडवरील जॉगिंग ट्रॅकची दुरावस्था:तातडीने दुरुस्ती करण्यासाठी नागरीकांसह माजी नगरसेविकेचे आयुक्तांना साकडे

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर रोड वरील आकाशवाणी टॉवर शेजारी असलेल्या मनपाच्या समर्थ जॉगिंग ट्रॅकची दुरावस्था झाली असून या ट्रॅकवर नियमीत पाणी मारणे, स्वच्छता होत नसल्याने जॉगर्स त्रस्त झाले असून आयुक्त रमेश पवार यांनी तातडीने या ट्रकवर स्वच्छता आणि देखभाल दुरूस्तीचे कामे हाती घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेविका डाॅ. वर्षा भालेराव यांनी केली आहे.

पश्चिम विभागातील गंगापूराेड परिसरातील मोठया संख्येने लहान्यांपासून ते वृद्धांपर्यंत शेकडोंच्या संख्येने पहाटेपासूनच या ट्रॅकवर वर्दळ असते. सकाळी आणि सायंकाळी रात्री उशिरापर्यंत जॉगिंग ट्रॅकवर व्यायामप्रेमी व्यायामासाठी येत असतात. काही तरूणांकडून धावण्यासह वेगवेगळ्या कसरती केल्या जातात. वृद‌्ध व महिला वर्ग याच ठिकाणी याेगासने देखील करतात. मात्र, काही दिवसांपासून हा ट्रॅक समस्याग्रस्त बनला आहे. या समस्यांचे तातडीने निराकरण करून ट्रॅकची दुरावस्था दूर करण्याची मागणी करणयात आली आहे.

ट्रॅकवर या समस्यांचे व्हावे निराकारण

  • मनपाने लाखो रुपये खर्चून बसविलेली अद्ययावत "म्युझिक सिस्टीम" अनेक महिन्यापासून बंद असून ती सुरू करावी.
  • ट्रॅकच्या भोवताली भरपूर कचरा साचलेला आहे, तो तात्काळ उचलला जावा. कचरा उचलण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा असावी.
  • ट्रॅकच्या कोपऱ्यात नागरिकांसाठी उभारलेल्या स्वच्छतागृहाची नियमीत स्वच्छता व्हावी. स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे.
  • या स्वच्छता गृहाच्या किमान एक किलोमीटर परिघामध्ये मनपाचे स्वच्छतागृह नसल्याने या स्वच्छता गृहाचा वापर मोठया प्रमाणात हाेत असताे.

जॉगर्सचे आराेग्य धाेक्यात

समर्थ जॉगिंग ट्रॅक परिसरातील नागरिक व जाॅगर्सचे आराेग्य निराेगी राहण्यासाठी ते ट्रॅकवर येत असले तरी या ट्रॅकची दुरावस्था बघता कचरा, अस्वच्छता आणि स्वच्छतागृहाची सफाई हाेत नसल्याने दुर्गंधीने आराेग्यच धाेक्यात आले आहे. मनपा प्रशासनाने तातडीने या समस्यांची दखल घेवून त्याचे निराकरण करावे.- प्रा.डॉ.वर्षा अनिल भालेराव, माजी नगरसेविका

बातम्या आणखी आहेत...