आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दोन्ही डोस घेतलेल्यांनाच वणी गडावर प्रवेश, दर्शनासाठी पास जवळ असणे आवश्यक, यात्रोत्सवही रद्द

कळवण19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पायी दर्शन रस्त्याला १२ ठिकाणी बारी

येत्या ७ तारखेपासून नवरात्रोत्सवासाठी सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहणार असून भाविकांना पास अनिवार्य असेल. कोविड प्रतिबंधक दोन्ही लस घेतलेले प्रमाणपत्र, ७२ तास अगोदर केलेल्या आरटीपीसीआर टेस्टचा अथवा २४ तासांच्या आत केलेल्या ॲंटिजेन टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. तसेच यात्रा रद्द करण्यात आली आहे.

प्रांताधिकारी विकास मीणा यांनी ट्रस्टच्या हाॅलमध्ये आढावा बैठक घेतली. तहसीलदार बंडू कापसे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी आदींसह सरपंच, उपसरपंच, विश्वस्त, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. घटनस्थापनेच्या दिवसापासून म्हणजेच ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे ही सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, असे असले तरी कोरोना संबंधीचे सर्व नियम हे काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नवरात्रात यात्रा देखील भरतात. मात्र, या यात्रांवर या काळात बंदी असणार आहे. त्यामुळे यंदाही व्यापाऱ्यासह अनेकांचा हिरमोड झाला आहे.

पायी दर्शन रस्त्याला १२ ठिकाणी बारी
नवरात्राेत्सवादरम्यान तसेच कोजागरी पौर्णिमेमुळे १८ व १९ ऑक्टोबरलाही खासगी वाहाने गडावर नेता येणार आहेत. एसटी बसेसमध्ये ५० टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक करता येईल. ऑनलाइन पास शक्य नसल्यास नांदुरी येथील बुथवरून मिळेल. कोविडच्या नियमावलीनुसार फेनिक्यूलर ट्राॅली सुरू राहील. पायी दर्शन रस्त्याला १२ ठिकाणी बारी असणार आहे. दर्शनासाठी फेनिक्यूलरमधील भाविकांना ३० तर पायरीने दर्शन घेणाऱ्या भाविकांना ७० टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...