आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकरी संप्रदाय सुषमा अंधारे यांच्या विरोधात आक्रमक:ज्या पक्षात अंधारे त्या पक्षाला मतदान करणार नाही; नाशिकमध्ये निषेध दिंडी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू देवदेवता तसेच संताबाबत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले हाेते. याचे पडसाद पूर्ण राज्यात उमटले हाेते. याच पार्श्वभुमीवर वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदायाच्या वतीने शुक्रवारी दि. 12 शहरातील काळाराम मंदिर ते रामकुंडापर्यंत टाळ, मूंदृग वाजवत राम कृष्ण हरी असा जप करत निषेध दिंडी काढली.

यावेळी रामकुंडावर वारकरी संप्रदायाकडून सुषमा अंधारे चा निषेध नोंदवण्यात आला यानंतर रामकुंड येथे गाेदावरीचे तिर्थ हातात घेत ज्या पक्षात सुषमा अंधारे असतील, त्या पक्षाला मतदान करणार नाही अशी शपथ देखील घेण्यात आली. तसेच उद्धव ठाकरे यांनी अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील करण्यात आली

सुषमा अंधारे विरोधात राज्यभरात वारकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. याचे पडसाद नाशिकमध्ये देखील उमटले असून साधू संतांबद्दल अपमानजनक शब्द वापरल्याचा आरोप करत वारकऱ्यांनी शुक्रवारी निषेध दिंडीच्या माध्यमातून अनाेखे आंदाेलन करण्यात आले. सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवता आणि साधु-संताबाबत केलेल्या विधानाबाबतचे व्हिडीआे गेल्या काही दिवसांपासून साेशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.याच पार्श्वभूमीवर काळाराम मंदिरापासून रामकुंडापर्यंत दिंडी काढण्यात आली.यावेळी रामकुंड परिसरात सुषमा अंधारेना गाेदामाई सुबुध्दी द्यावे अशी देखील प्रार्थना करण्यात आली.

दिंडीच्या समाराेप झाल्यावर पचंवटी पाेलिस ठाण्यात निवेदन देखील देण्यात आले असून अंधारेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान या दिंडी दरम्यान काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माेठा पाेलिस बंदाेबस्त देखील तैनात करण्यात आला हाेता. यावेळी वारकरी संप्रदायाचे संजय धाेंडगे महाराज, दिनकर पाटील,नंदु कहार, सुजाता करजगीकर,निखील नवले, मृणाल धाेडके, भुषण काेथमिरे, प्रतिक शुक्ल आदीसह माेठ्या संख्येने वारकरी, पुराेहीत संघाचे पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

पिंडदान करण्यासाठीही अंधारे पवित्र नाही

वारकरी संप्रदाय हे रामकुंडावर सुषमा अंधारे यांचे पिंडदान करत निषेध करणार हाेते. मात्र सुषमा अंधारे या इतक्या पवित्र नाही की त्याचे रामकुंडावर पिंडदान करावे अशीही टीका यावेळी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...