आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक राज्याच्या मुख्य सचिवांच्या आदेशानुसार अल निनोमुळे पाऊस लांबल्यास ३१ ऑॅगस्टपर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी एप्रिल व मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याबाबत महापालिका अायुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या प्रस्तावावर ते महिनाभराच्या प्रशिक्षणासाठी गेल्यानंतरही निर्णय झाला नसल्यामुळे सुरू असलेली घालमेल थांबली आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या अाढाव्यानंतर महापालिकेला २०० दशलक्ष घनफूट वाढीव पाणी देण्याची तयारी जलसंपदा विभागाने दाखवल्यामुळे अाता शहरासाठी १५ ऑगस्टपर्यंत पाणी पुरणार आहे. त्यामुळे तूर्तास मे महिन्यात हाेणारी पाणी कपात टळली असून जून व जुलै महिन्यात गरजेनुसार पाणी कपात केली जाईल अशी माहिती अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली.
पाणीकपात नक्की कशासाठी?
अल निनाेच्या संकटामुळे जून व जुलै महिन्यात पाऊस अाेढ देऊ शकतााे, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली हाेती. त्यानंतर राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी पाण्याच्या नियोजनाचे आदेश दिले हाेते. आयुक्त डाॅ. पुलकुंडवार यांनी एप्रिल व मे महिन्यात आठवड्यातून एक दिवस तर जून व जुलै महिन्यात आठवड्यातून दाेन दिवस पाणी कपातीचा प्रस्ताव दिला हाेता.
साधारणपणे धरणातील पाणी आरक्षण हे ३१ जूलैपर्यंतचा विचार करून केलेले असते. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी एप्रिल व मे महिना मिळून नऊ दिवस कपात केलेले पाणी पुढे वापरता येईल. तसेच जून व जुलैत आठवड्यातून दाेन दिवस याप्रमाणे साधारण १८ दिवसाचे असे २७ दिवसांचे पाणी वाचवणे शक्य हाेते.
या प्रस्तावाचे काैतुकही झाले मात्र पालिकास्तरावर अंतिम निर्णय झाला नव्हता. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी तीन वेळा बैठक बाेलावली मात्र, काही ना काही कारणामुळे बैठक लांबणीवर पडली. दरम्यान, मे महिना सुरू झाल्यानंतरही कपात हाेत नसल्यामुळे पावसाने अाेढ दिली तर पुढे काय करायचे असा प्रश्न हाेता.
पाण्याचा प्रश्न सध्या निकाली
अखेरीस पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अाढावा घेतल्यानंतर त्यात जलसंपदाने वाढीव २०० दशलक्ष घनफूट पाणी दिल्यास ३१ जुलैनंतर पुढील १५ दिवसाचा प्रश्न निकाली निघेल. उर्वरित १५ दिवसाचा कालावधी भरून काढण्यासाठी जून व जुलै महिन्यात अाठवड्यातून दाेन दिवस पाणी बंद ठेवले तर कसर भरून निघेल, असे अभियंता चव्हाणके यांनी सांगितले.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत पालिकेला २०० दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी जलसंपदा विभाग देणार आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल. त्यापुढील १५ दिवसांच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. मात्र जून-जुलै महिन्यात किती पाऊस पडतो. त्याचे पावसाचे प्रमाण बघून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. - शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, महापालिका, नाशिक
कपातीचा निर्णय जूनमध्ये
२०० दशलक्ष घनफूट पाणी मिळाले तर पालिकेचे वार्षिक पाणी आरक्षण ६ हजार दशलक्ष घनफूट इतके हाेईल. यापुर्वी ५८०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मंजूर हाेते.
ऑगस्टपर्यँत् पाणी पुरेल
आवश्यकता वाटल्यास जुलै महिन्यात कपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे. धरणांमध्ये मुबलक पाणी आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोअरवेलही चार्ज आहेत. जरी पाऊस लांबला तरीही ३१ ऑगस्टपर्यंत पाणी मिळू शकेल असे चित्र सध्या तरी उपलब्ध पाणीसाठ्यांवरून दिसत आहे. तरीही आवश्यकता वाटल्यास जुलैमध्ये पाणी कपातीबाबत निर्णय घेता येईल. - दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक पावसाचे प्रमाण बघून पुढील नियोजन करावे लागेल
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.