आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक ऑक्सिजन दुर्घटना:'माझी मम्मी गेली, मी तिला वाचवू शकले नाही...'मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हॉस्पिटलचे कर्मचारी मीडियासमोर काम करण्याचे नाटक करू लागले

नाशिक येथील महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. या घटने रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आम्ही येथील काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी आपली व्यथा आमच्यासमोर मांडली.

माझ्या मम्मीला मी वाचवू शकले नाही...
माझी मम्मी दिल्लीवरुन इथं आली होती. तिला वाटलं होतं माझी मुलगी माझा इलाज करेल...पण मी नाही वाचवू शकले तिला. मेली माझी मम्मी.माझ्या आईला या लोकांनी ऑक्सिजन दिले नाही, तडफडून मेली माझी आहे...' हा आक्रोश आहे एका मुलीचा, जिने नाशिकमधील दुर्घटनेत आपल्या आईला गमावले. यावेळी या महिलेच्या पतीने सांगितले की, सकाळी आम्ही आईना जेवण दिले होते. घरी अंघोळ करण्यासाठी गेलो होतो, तेवढ्यात हॉस्पीटलमधून फोन आला की, तुमची आई गेली. आमच्या आईला काहीच झालं नव्हतं, ती फक्त त्या ऑक्सिजनमुळे गेली.

मीडियासमोर काम करण्याचे नाटक केले...
यावेळी एका व्यक्तीने सांगितले की, रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांकडे लक्ष्य देत नव्हते. आम्ही अनेकांना मदत केली. रुग्णालयातील कर्मचारी फक्त पोलिस आणि मीडियाची लोक आत आल्यावर काम क

रण्याचे नाटक करू लागले. आमच्या वॉर्डमधील 16-17 रुग्ण मेले.

नातेवाईक संतप्त
यावेली एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्णालयात ऑक्सिजन लिक झाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे अनेकजण संतत्प झाले आहेत. सध्या आम्ही पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी हॉस्टिटलला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दोषींवर योग्य कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...