आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्हा बँकेने नासाका कामगारांचे 33 कोटी द्यावे:अन्यथा तीव्र आंदोलन करणार; भास्कर गोडसे यांचा इशारा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक सहकारी साखर कामगारांचे 33 कोटी रुपयांहुन अधिक थकीत रक्कम जिल्हा बँकेने कामगारांना तातडीने द्यावे, सध्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून त्याला सर्वस्वी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. बँकेने कामगारांची थकीत रक्कम त्वरीत न दिल्यास बँके समोर नासाका कामगार गटा-गटाने उपोषण करणार असल्याचा इशारा नासाका युनियनचे अध्यक्ष काँ. भास्कर गोडसे यांनी दिला.

नाशिक साखर कामगार युनियन चा कामगारांच्या विविध मागणीसाठी मंगळवारी सिन्नरफाटा येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. काँ. भास्कर गोडसे यांनी कामगारांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, सन 2013 पासून कामगारांच्या विविध प्रकारचे थकीत रक्कमा बँकेने दिलेल्या नाही. काही कामगार मयत झाले. नासाका, जिल्हा बँक व भाडेतत्त्वावर कारखाना घेणाऱ्यांमध्ये झालेल्या त्रिस्तरीय करारात देखील कामगारांचे ऑगस्ट 2022 पासूनचे पुढील पैसे देण्यास कारखाना 25 वर्षापर्यंत जबाबदार राहील. मात्र सन 2022 मागील सर्व थकीत पैशाची जबाबदारी ही जिल्हा बँकेची असुन यामध्ये थकीत पगार 1,48,899, भविष्य निर्वाह निधी 56,653, ग्रॅज्युटी 1,16,464, शिल्लक रजेचा पगार 7,533 इतका असून एकूण रक्कम 33 कोटी इतका आहे. तर सर्व थकीत रकमेची जबाबदारी ही नासाकाची नसून ती जिल्हा बँकेची असल्याने पत्र देखील कामगार युनियन ला कारखान्याने दिले असल्याचा खुलासा गोडसे यांनी केला.थकीत रकमेबाबत खासदार हेमंत गोडसे यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्ट मंडळासह भेट घेणार असल्याचेही यावेळी सांगितले.यावेळी कॉ. बबनराव कांगणे,संतु हुळहुळे, सुभाष दळवी, देवकिसन गायखे, अरुण सोनवणे, पांडुरंग मोंढे हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...