आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद:90 च्या दशकातील अविस्मरणीय गोल्डन हिट्समध्ये रमले नाशिककर; कालिदास कलामंदिरात आयोजित एव्हरग्रीन 90, रोमँटिक ड्युटस् कार्यक्रमास नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्वदीच्या दशकातील एव्हरग्रीन अर्थात सदाबहार प्रेमगीतांच्या अविस्मरणीय आठवणीत नाशिककर प्रेक्षक रममान झाले. ९० च्या काळातील लोकप्रिय झालेली हिंदी चित्रपटातील गाणी आजदेखील प्रेक्षक आवडीने ऐकतात, याची अनुभूती रविवारी (दि. ३) कालिदास कलामंदिरात आयोजित एव्हरग्रीन ९०, रोमँटिक ड्युटस् कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहावयास मिळाली. या कार्यक्रमास नाशिककरांनी तुडुंब गर्दी केली होती.

महाकवी कालिदास कलामंदिरात एव्हरग्रीन ९०, रोमँटिक ड्युटस् कार्यक्रमास नाशिककरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. गायक रवींद्र बागुल, शैलेंद्र बकरे, प्रकाश रत्नाकर, नमिता राजहंस आणि प्रीती दीक्षित यांच्या जोडीला मेलोडी क्वीन रागिणी कामतीकर यांनी सादर केलेल्या ९० दशकातील गोल्डन हिटस् गाण्यांना रसिक प्रेक्षकांनी दाद दिली. या कार्यक्रमाचे निवेदन प्रेषीत रुद्रवार आणि प्रवीण पोद्दार यांनी केले. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

बातम्या आणखी आहेत...