आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डे मुक्त नाशिक!:रस्त्यांवरील खड्ड्यामुंळे नाशिककर त्रस्त; स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्यासाठी भाकपा 'चे' आवाहन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सामान्य नागरीक त्रस्त आहेत. व्यवसायिक, व्यापारी, उद्योजक आणि रस्त्यांवरून दैनंदिन प्रवास करणारे हजारो नागरिक सातत्याने पालिकेकडे अर्ज करत आहेत. असे असताना स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्यासाठी भाकपा 'चे' आवाहन केले आहे.

विविध संस्था, संघटना,कार्यकर्ते पालिकेला वारंवार निवेदने देत आहेत. तसेच आंदोलने देखील करण्यात येत आहे. परंतु पालिकेच्या निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांवर यांचा काही परिणाम होताना दिसत नाही.

जनतेच्या कराचा पैसा खड्ड्यात

दरम्यान, नाशिक शहराचा समावेश देशातील शंभर 'स्मार्ट शहरे' करण्याच्या यादीत करण्यात आला असून त्यासाठी केंद्र शासनाने भरीव आर्थिक मदत केली आहे. पण तितकाच खर्च पालिकेला जनतेच्या कराच्या पैशातून करावा लागला लागत आहे. या माध्यमातून शहरातील रस्ते, वाहतूक, पार्कींग व्यवस्था 'स्मार्ट' करण्यासाठी केंद्र शासनाने निधी देखील दिला आहे. महापालिकेने कोट्यावधी रूपयांची भांडवली गुंतवणूक केली आहे.पण अधिकारी, ठेकेदार व काही नगरसेवकांमुळे ही भांडवली गुंतवणूक अर्थात जनतेच्या कराचा पैसा खड्ड्यात गेला आहे.

महापालिकेतील बांधकाम विभागातील काही भ्रष्ट अधिकारी,काही भ्रष्ट नगरसेवक व लुटारू ठेकेदार यांची साखळी रस्त्याच्या थंद्यातून सामान्य जनतेच्या कराच्या पैशावर डल्ला मारत आहे. त्यांना प्रतिबंध करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी न दाखवल्याने ही निर्ढावलेली मंडळी आतातर नागरिकांच्या जीवावरच उठली आहेत.

अपघाताचे प्रमाण वाढले

खड्डयांना चुकवताना रोज‌ अपघात घडत आहेत. वयोवृध्द,अपंग,आजारी व्यक्तींना खड्ड्यांच्या रस्यावरून जाणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखेच आहे. खड्ड्यामुळे वाहनांची गती मंद झाल्याने ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम होणे नित्याचेच झाले आहे.याचा परिणाम शहरातील उद्योग,व्यापारावर होत असून विकासाची चाके खिळखिळी होत आहेत.

सामान्य जनतेचा आक्रोश थांबविण्यासाठी नवीन आयुक्तांनी आदेश दिले आहेत.करारानुसार नवीन रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ३वर्षाच्या आत दायित्व (डिफेक्ट लायबिलिटी )संबंधित ठेकेदारांची असते. पण असे असताना पालिका अधिका-यांनी आपत्कालीन नीधी देऊन पालिकेच्या तिजोरीतून करोडो रूपयांची तरतूद करून ते खड्डे बुजवून घेतले व ठेकेदारांना पाठीशी घातले.

परंतु पावसाळ्यात या बुजविलेल्या खड्डयांतील मुरूम,गट्टू वाहून गेले व एकप्रकारे पुन्हा एकदा ठेकेदारांनी पालिकेला फसविले.मनपा आयुक्तांनी कराराप्रमाणे खड्डे भरून न देणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला खरा पण महापालिकेच्या बा़धकाम विभागातील भ्रष्ट अधिका-यांना शिक्षा कोण करणार? भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही नाशिककर जनतेसाठी या प्रश्नावर व्यापक जनआंदोलनाला सुरूवात केली आहे. त्यासाठी संपूर्ण शहरात सह्यांची मोहिम राबवून विविध मागण्यांचे निवेदन पालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...